NCP Jitendra Awhad : 'मंत्रालयात दलालीची नवीन पद्धत'; जितेंद्र आव्हाडांचा घणाघात

NCPSP Jitendra Awhad Slams Mahayuti Govt Over Brokerage in Ratnagiri : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद महायुती सरकारच्या कामकाजावर चौफेर टीका केली.
NCP Jitendra Awhad
NCP Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

Jitendra Awhad Ratnagiri speech : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. मंत्रालयातील कामकाजात कशी दलाली सुरू आहे, याबाबतचा संशय व्यक्त करताना खळबळ उडवून दिली.

'मंत्रालयात नवीन पद्धत सुरू झाली आहे. सगळ्या फाईली मंत्रालयात पाठवल्या जातात. त्यांचे दलाल सकाळीच गाडी पकडून मंत्रालयात जातात', असा खळबळ आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेची केलेल्या घोषणेत पारदर्शकता हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली. जातीनिहाय जनगणनेत हेराफेरी झाली, तर सगळं सपलंच म्हणून समजा, असे सांगताना महाराष्ट्रात दलितांवर, मागासवर्गीयांवर अन्याय होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात नाहीत. ओबीसी आरक्षणाचा खेळखंडोबा करून ठेवलेला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

NCP Jitendra Awhad
Gunaratna Sadavarte : पाकिस्तानातून लग्न करून आलेल्या महिलांमागे 'मॅरेज जिहाद', तर नाही ना? गुणरत्न सदावर्तेंना वेगळाच संशय

शरद पवार (Sharad Pawar) यांना सोडून जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यावर बोलताना, एका पराभवाने पक्ष संपत नसतो. आम्ही लढण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यमान सरकार लोकशाहीवर विश्वास नाही. ते लोकशाहीचा पाया उद्ध्वस्त करत आहे. हेच कार्यकर्त्यांना समजावून देऊन रस्त्यावरची लढाईसाठी प्रोत्साहन देण्यासाठी कोकण दौऱ्यावर आलो आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

NCP Jitendra Awhad
Ajit Pawar Politics: माजी मंत्री अनिल पाटील इनकमिंगसाठी सरसावले; भाजपच्या खासदार स्मिता वाघ यांना आव्हान?

जितेंद्र आव्हाड यांनी महायुती सरकारमधील भाजप मंत्री नीतेश राणे यांचे नाव न घेता, जोरदार टीका केली. 'कोकण हा वैचारिक प्रदेश आहे. सिंधुदुर्गमधून जातीय विद्वेषाची भाषा पसरवली जात आहे. सरकारमधील मंत्रीच जातीय विद्वेषाची भाषा करत असल्याचा हा लोकशाही घातक आहे आणि दुर्दैवी आहे', असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी केला.

जातीय विद्वेषाची भाषा करताना, या मंत्र्यांना संविधानावर हात ठेवून घेतलेल्या शपथेचा विसर पडलेला आहे. ही परिस्थिती समाजाला घातक आणि अस्वस्थता पसरविणारी आहे, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com