Kiran Lahamate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Akole Water Issue : भंडारदरा-निळवंडेच्या पाण्यावरून अकोलेकर आक्रमक; आमदार लहामटेंची ऑडिटची मागणी

Kiran Lahamate Demands Water Audit of Bhandardara and Nilwande Dams : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांचे आवाहन; खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचाही पाठिंबा.

Pradeep Pendhare

Maharashtra water news : दु्ष्काळाची दाहकता वाढू लागल्याने पाणी प्रश्नावर लोकप्रतिनिधी आक्रमक होऊ लागले आहे. भंडारदरा धरण असलेल्या अकोले तालुक्यातील अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार डाॅ. किरण लहामटे तालुक्याच्या हक्काच्या पाणी प्रश्नावरून आक्रमक झाले आहेत. पाण्याच्या प्रश्नावर केवळ आमदारच विरोध करतात, इतरांना तालुक्याचे काही देणे-घेणे नाही, असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वाटत असेल. मात्र, विखे पाटील यांच्याशी माझा कोणताही वाद नाही. तालुक्यातून वर्षभरात किती पाणी बाहेर गेले, याचे ऑडिट करा, अशी मागणी आमदार लहामटे यांनी केली.

तसेच एकनाथ शिंदे शिवसेनेत दाखल झालेले खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी देखील भंडारदरा आणि निळवंडे धरणांतील पाण्याच्या उधळपट्टीच्या प्रश्नावर तालुक्याचा भूमिपुत्र म्हणून मी अकोलेकरांसोबत आहे, असे सांगितले.

अकोले तालुक्याच्या हक्काचे पाणी (Water) मिळविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरण्याची गरज आहे, असे आवाहन आमदार डॉ. किरण लहामटे यांनी अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात केले. खासदार भाऊसाहेब वाकचौरे, कारखान्याचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर उपस्थित होते.

डॉ. लहामटे म्हणाले, "कामगार आणि शेतकऱ्यांच्या (Farmer) त्यागातून अगस्ती कारखाना उभा राहिला असून, तो टिकविण्याची जबाबदारी सर्वांची आहे." सीताराम पाटील गायकर यांनी, अगस्ती कारखान्यासमोर अनेक अडचणी असतानाही तो सुरू व्हावा, अशी सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांची इच्छा होती. अगस्ती कारखाना बंद पडल्यास तो पुन्हा सुरू होणे कठीण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला ऊस अगस्ती कारखान्यालाच घालावा, असे आवाहन केले.

ज्येष्ठ संचालक परबतराव नाईकवाडी यांनी यंदा कार्यक्षेत्रातील दोन लाख टन आणि बाहेरील दोन लाख टन, असे एकूण चार लाख टन ऊस गाळप करण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याचे सांगितले.

खासदार वाकचौरे देखील अकोल्यातील पाणी प्रश्नावर पहिल्यादांच भाष्य केले. भंडारदरा आणि निळवंडे धरणांतील पाण्याच्या उधळपट्टीच्या प्रश्नावर तालुक्याचा भूमिपुत्र म्हणून मी अकोलेकरांसोबत आहे. निर्णायक भूमिका घेण्याची वेळ आल्यास मागे हटणार नाही, असे आश्वासन दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT