

Nashik Crime News : आरपीआय रामदास आठवले पक्षाचे नेते, माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने जामीन मंजूर केला तरीही लोंढे यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत. अद्याप त्यांची सुटका होण्याची चिन्हे नाहीत.
केंद्रीय राज्यमंत्री आणि आरपीआय नेते रामदास आठवले यांचे निकटवर्तीय प्रकाश लोंढे यांच्यावर एक वर्षांपूर्वी खंडणी आणि हत्येचा चा प्रयत्न आदी कोण हे दाखल आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हेगारी विरुद्ध मोहीम उघडली होती. त्यात लोंढे अडचणीत आले.
नाशिक (Nashik) शहरातील एका सातपूर येथील ऑरा बार आणि हॉटेलवर झालेला गोळीबार आणि विविध गुण्यांमुळे नागरिक संतप्त झाले होते. वाहनांची जाळपोळ आणि सोनसाखळ्यांच्या चोऱ्यांच्या घटना वाढल्या होत्या. नागरिकांतील दादाजी मुळे शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला होता.
माजी नगरसेवक लोंढे यांसह आरपीआयचे जिल्हाप्रमुख भूषण लोंढे आणि त्यांच्या भावासह 'पीएल' टोळीतील विविध गुन्हेगारांवर पोलिसांनी खंडणी, अपहार, गोळीबार आणि प्राणघाटक खाल्ले असे विविध गुन्हे दाखल केले होते. खंडणीसह अन्य गंभीर गुन्हे (Crime) दाखल असल्याने त्यांच्या विरोधात 'मोक्का'ची कारवाई करण्यात आली होती. गेल्या वर्षभर लोंढे कारागृहात आहेत.
खंडणी आणि गोळीबाराच्या गुन्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी प्रकाश लोंढे यांना जामीन मंजूर केला. मात्र अन्य आठ गुन्हे दाखल असल्याने त्यात ते अटकेत आहेत. या गुन्ह्यांमध्ये जामीन नसल्याने त्यांना जेलमध्येच राहावे लागणार आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले गेल्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी लोंढे यांच्यावर राजकीय हेतूने कारवाई झाली. अन्य संशयतांना जामीन मिळाला मात्र लोंढे यांना जामीन मिळालेला नाही. याबाबत खंत व्यक्त केली होती, हे विशेष!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.