Shivsena Meeting
Shivsena Meeting Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शिवसेनेत येण्यास सर्व पक्षांचे दिग्गज नेते उत्सुक

Sampat Devgire

नाशिक : सर्वसामान्यांसह समाजातील (All community) सर्व घटकांना (justice to All class) न्याय मिळवून देणारा पक्ष म्हणजे शिवसेना (Shivsena) असल्याने या पक्षात प्रवेश करण्यासाठी अनेक जण (Many coming forward to joine Shivsena) पुढे येत आहेत. विविध पक्षातील नगरसेवकांसह दिग्गज नेतेही आमच्याशी संपर्क साधून असून त्यांचेही प्रवेश सोहळे महापालिका निवडणुकीच्या आधी होतील, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी (Bhausaheb Choudhary) यांनी केले.

नाशिक महानगरातील सामाजिक कार्यकर्ते प्रणिल पताडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा त्यांच्या हातावर शिवबंधन बांधून त्यांच्या हाती पक्षाचा ध्वज सोपवितांना चौधरी बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेते माजी मंत्री बबनराव घोलप, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, मनपा गटनेते विलास शिंदे, चांदवड, देवळा, मध्य नाशिक विधानसभा प्रमुख ललित शाहीवाले, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख वैभव ठाकरे, नगरसेवक संतोष गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

नाशिक महानगरात शिवसेना पक्षाची भक्कम बांधणी झाली असून कोणत्याही निवडणुकांना सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. विविध उपक्रमांद्वारे शिवसैनिकांचे जनतेशी अतूट असे नाते निर्माण झाले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेनाच स्वबळावर सत्तेवर येईल ही काळ्या दगडावरची रेष आहे, असा विश्वास महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केला.

आम्ही जेथे जातो तेथे आमचे ज्या जल्लोषात स्वागत होते ते बघता शिवसेनेचे विचार जनतेत किती रुजले आहेत याची प्रचिती येते.उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने राबविलेले लोकाभिमुख निर्णय बघता महापालिकेतील भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी लोक किती आतुर झाले आणि शिवसेनेकडे ते मोठ्या आशेने बघत असल्याचे निदर्शनास येते, असे शिवसेना उपनेते बबनराव घोलप आणि जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी आपल्या भाषणांत सांगितले.

प्रवेश सोहळ्याप्रसंगी बाळासाहेब कोकणे, देवा जाधव, राजेंद्र क्षीरसागर, योगेश देशमुख, सचिन बांडे, दत्ता दंडगव्हाळ, मसूद जिलानी, वीरेंद्रसिंग टिळे, पवन मटाले, उमेश चव्हाण, प्रदीप पठाडे, नीलेश साळुंके, नाना काळे, किरण काळे, गणेश गडाख, विनोद नुनसे, श्याम कंगले, प्रमोद नाथेकर, योगेश गाडेकर, राकेश साळुंके, बबलू चंदनानी, गोकूळ नागरे, गोकूळ तिडके, विक्रांत थोरात, शेखर पवार, गोविंद कांकरिया आदी उपस्थित होते.

यांचा झाला प्रवेश

विकी वाघ, ऋषिकेश माळी, कृष्णा माळी, अजय माळी, योगेश माळी, सागर काकड, नवनाथ काकड, सोपान आडके, सागर राऊत, प्रशांत शेळके, मनीष बोरस्ते, नागेश सोनवणे, आकाश वानखेडे, पवन दांडेकर, लखन कानकाटे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT