नाशिक : ध्वनी, (Noise) वायू (Air) व जलप्रदूषण (Water polluation) कमी करण्यावर केंद्र सरकारचा (Centre concentrate on reducing polluation) भर असून, येत्या दहा वर्षांत पेट्रोलचा वापर दहा टक्के (Reduce petrol consumption 10 %) तर डिझेलचा वापर २५ टक्क्यांवर (Reduce Diesel consumption 25 %) आणण्यावर केंद्र सरकारचा भर आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलचा (Increase consumption of ethanol) वापर वाढवल्यास इंधनावर खर्च होणाऱ्या दहा ते बारा लाख कोटी रुपयांची बचत होईल, (Save 10 -12 lac crores) असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी येथे केले.
पंचवटीतील प्रभाग तीनमधील साईनगर परिसरात नाशिक महापालिका आणि अमृत योजना यांच्यातर्फे पाच एकर जागेवर अद्ययावत श्रद्धेय पंडित दीनदयाल उपाध्याय थीम पार्कच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मंत्री गडकरी बोलत होते.
गोदावरीचा जिथे स्पर्श झाला आहे, अशा साधू-संतांच्या भूमीत सांस्कृतिक, धार्मिक व तत्त्वज्ञानाचे साहित्य जीवन जगण्याची प्रेरणा देत असतात. त्यामुळे देशात नाशिकचे नाव अग्रेसर आहे. अशा नगरीत उभारण्यात आलेल्या या थीम पार्कमुळे येथील ज्येष्ठांसह तरुणांच्या आरोग्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असा आशावाद जागवितानाच त्यांनी वाहनांवरील कर्कश ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी भारतीय वाद्यातील मंजूळ स्वरांत वाहनांचे हॉर्न बनविण्याचा कायदा करण्यात आला असून, यामुळे ध्वनिप्रदूषण रोखण्यास यशस्वी होऊ, असे श्री. गडकरी यांनी सांगितले.
स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक, हरित नाशिक या संकल्पनेतून ‘एक झाड-एक परिवार’ ही योजना राबवून देशात नंबर एक येण्यासाठी नाशिककरांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन करतानाच श्री. गडकरी यांनी इथले ट्रॅक्टर व सर्वच बस ‘सीएनजी’वर चालविल्यास प्रदूषणात मोठी घट होईल, असेही ते म्हणाले.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महापौर सतीश कुलकर्णी, मनपा आयुक्त कैलास जाधव, भाजप प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, सुरेशबाबा पाटील, आमदार ॲड. राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे, माजी आमदार बाळासाहेब सानप, विजय साने, स्थायी समिती सभापती गणेश गिते, मनपातील भाजप गटनेते अरुण पवार, सभागृहनेते कमलेश बोडके, प्रभाग समिती सभापती मच्छिंद्र सानप, नगरसेविका प्रियंका माने, रुची कुंभारकर, पूनम मोगरे, तपोवन मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी आदी उपस्थित होते.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.