Onion Issue Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Onion Politics : कांदा प्रश्न खासदार, आमदारांची झोप उडवणार?

Sampat Devgire

Nashik Politics News : गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी निर्यात तसेच वाहतूक अनुदानाच्या प्रश्नावर लिलाव बंद पुकारला आहे. त्यामुळे आतापर्यंत सुमारे १०० कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचा दावा केला जात आहे. ही स्थिती कायम राहिल्यास शेतकऱ्यांचा लोकप्रतिनिधींवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. (Arounf 1K million onion trade in trouble due to trders agitation)

जिल्ह्याच्या (Nashik) राजकारणावर सातत्याने कांदा पिकाच्या प्रश्नाचा प्रभाव राहिला आहे. सध्या कांदा लिलाव बंद असल्याने सत्ताधारी भाजप, (BJP) एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) (NCP) गटाच्या आमदारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात कांदा प्रश्न चांगलाच पेटला असून, शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या ‘बंद’मुळे गत पाच दिवसांत कांदा लिलाव न झाल्याने जिल्ह्यात ७.५ लाख क्विंटलवर आवक तुंबली आहे; तर तब्बल १०० कोटींवर उलाढाल ठप्प झाली. कांदा लिलाव होत नसल्याने कांदा सडत असून, पावसामुळे कांदा सडण्याचा वेग वाढत आहे. याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे.

शेतकऱ्यांच्या या प्रश्नाला प्रामुख्याने राज्यातील तसेच केंद्रातील सरकारच्या धोरणाचा फटका बसला आहे. सध्या व्यापाऱ्यांनी ज्या मागण्यासाठी लिलाव बंद आंदोलन पुकारले आहे, त्या मागण्या शेतकरी संघटनांच्यादेखील आहेत. त्यामुळे याबाबत शेतकरी व व्यापारी यांच्या मागण्या सारख्याच आहेत.

हा प्रश्न सोडविण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी अद्याप फारसा पुढाकार घेतलेला नाही. पालकमंत्री दादा भुसे यांनी याबाबत घेतलेली बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे आता कृषिमंत्र्यांसमवेत येत्या मंगळवारी बैठक होणार आहे. त्यात तोडगा निघाल्यास स्थानिक आमदार आणि खासदारांवर त्याचा राजकीय दबाव वाढणार आहे. त्यामुळे हा प्रश्न न सुटल्यास लवकरच सर्वच पक्षांच्या आमदार, खासदारांची झोप उडवणार आहे. त्यामुळे आमदार अस्वस्थ झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT