Eknath Khadse : अफरातफर करणाऱ्यांना भाजप पाठीशी का घालत आहे?

NCP leader Eknath Khadse Criticized BJP on District Milk Fedration-जळगाव जिल्हा दूध संघाची भाजपच्या कारकिर्दीतील पहिली वार्षिक सभा आज होत आहे.
Eknath Khadse
Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

Jalgao BJP v/S NCP Politics : आमची सत्ता असताना जळगाव जिल्हा दूध संघ ही नावाजलेली संस्था होती. ती सातत्याने नफ्यात होती. मात्र, आता तिचे कामकाज चांगले चालले नाही. संस्थेला यंदा तोटा झाला. गेल्या वर्षापर्यंत संस्थेला ‘अ’ वर्ग होता, परंतु आता ‘ब’ वर्ग मिळाला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. (Auditor Given B class for Jalgaon Milk Fedration for last year)

जळगाव (Jalgaon) दूध संघाची वार्षिक सभा आज होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी संघातील सत्ताधारी भाजपच्या (BJP) नेत्यांवर टीका केली आहे.

Eknath Khadse
BJP Political News : अभिनेत्री माधुरी दीक्षित भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढविणार ? भाजपचा 'मास्टर प्लॅन' ठरला ?

गेली सात वर्षे सातत्याने नफ्यात असलेला जळगाव जिल्हा दूध संघ यंदा तब्बल सहा कोटी ७२ लाख रुपयांच्या तोट्यात आहे. आतापर्यंत ‘अ’ वर्गात असलेला संघ यंदा ‘ब’ वर्गात आला. नवीन सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप राज्याचे माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी केला.

आमदार खडसे म्हणाले, की जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी मंदाकिनी खडसे असताना हा संघ गेली सात वर्षे सातत्याने नफ्यात होता. मात्र, यंदा हा संघ तब्बल सहा कोटी ७२ लाख रुपयांच्या तोट्यात आहे.

ते पुढे म्हणाले, की वार्षिक अहवालात कोणतीही तरतूद नसताना दोन कोटींचा भाव फरक द्यावा लागला आहे. सहकारी नियमानुसार १२ रुपयांप्रमाणे वाढ करावी लागली; परंतु खासगी विक्री सहा रुपयांप्रमाणे झाली. त्यामुळे दुप्पट फरक द्यावा लागला आहे.

दूध भुकटी खरेदीत दोन कोटी रुपयांची अफरातफर तत्कालीन अधिकारी अंबीकर व केंदार यांनी केली. विद्यमान संचालकांनी अद्याप त्यांची चौकशीच केलेली नाही. त्यामुळे दोन कोटींची ही रक्कम वार्षिक अहवालात आलेली आहे.

Eknath Khadse
NCP Nashik News : प्राजक्त तनपुरे घेणार छगन भुजबळांची जागा!

घसारा हा कॅश लॉस नसतो; परंतु ती किंमतही घसाऱ्यात दाखविण्यात आली आहे. दूध भुकटी वेळेत विक्री न केल्याने नुकसान झाले. कामगारांचे वेतनासाठी प्रत्यक्षात पाच कोटींची तरतूद दाखविण्यात आलेली आहे.

संघाने अन्यायकारक निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट करून खडसे म्हणाले, की दर दिवशी ३०० लिटर दूध पुरविणाऱ्या संस्थाच आता निवडणुकीस पात्र ठरणार आहेत. मुक्ताईनगर तालुक्यात रोज ३०० लिटर दूध पुरविणारी एकही संस्था नाही. त्यामुळे ते पात्र ठरणार नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर हा अन्यायच असेल.

Eknath Khadse
Eknath Khadse On Fadanvis : नाथाभाऊ स्पष्टच बोलले; म्हणाले 'हा' नेता सूड उगविणारा !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com