Rahaata Bazar Committee Chairman
Rahaata Bazar Committee Chairman Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rahaata Bazar Samiti Results: थोरातांनी प्रतिष्ठा पणाला लावूनही राधाकृष्ण विखेंनी राहाता एक हाती राखलं

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar News : राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. त्यानंतर काही बाजार समित्यांचा निकालही समोर येत आहेत.

राहाता बाजार समितीचाही निकाल समोर आला आहे. राहाता बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपच्या सर्वच उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे.

राहाता बाजार समितीच्या 18 जागांपैकी 15 जागांसाठी निवडणूक पार पडली. तर यापूर्वीच भाजपच्या 3 जागा बिनविरोध झाल्या होत्या. आता राहाता बाजार समितीचा निकाल समोर आला असून सर्वच जागांवर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची या राहाता बाजार समितीच्या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, बाळासाहेब थोरांतांनी प्रतिष्ठा पणाला लावूनही राधाकृष्ण विखे पाटलांनी राहाता एक हाती राखलं आहे.

दरम्यान, राहाता बाजार समितीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी आपलं वर्चस्व कायम राखलं आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT