BJP corporator Sunil Baisane Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP News : नगरसेवकाचा भाजपला घरचा आहेर, ‘ठेकेदारांकडून महापालिकेत सुरू आहे लूट’

Sampat Devgire

Dhule BJP News : महापालिकेत ठेकेदार आणि प्रशासन मिळून महापालिकेची लूट करीत आहेत. त्यात जनतेच्या अनेक प्रश्नांवर काहीही कामे होत नाहीत. त्यामुळे जनता त्रस्त आहे, त्यावर कारवाई होणार की नाही, असा प्रश्न सत्ताधापी भाजप नगरसेवक सुनील बैसाणे यांनी गुरूवारी स्थायी समितीच्या बैठकीत केल्याने खळबळ उडाली. (Bjp`s own party corporator made serious allegations on Ruling party of Dhule)

धुळे (Dhule) महापालिकेतील भाजपच्या (BJP) कारभाराबाबत सातत्याने विरोधकांकडून राजकीय हल्ले होत असतात. त्यामुळे पक्षाचे नेते देखील नाराज आहेत. मात्र काल याबाबत खुद्द भाजपच्या नगरसेवकानेच गंभीर आरोप केल्याने पक्षाला घरचा आहेर मिळाला आहे.

यावेळी नगरसेवक म्हणाले, आम्ही पाच वर्षांसाठी निवडून आलो आहोत, मग कचरा संकलनाचा ठेका सात वर्षांसाठी कसा काय देण्यात आला?, कचरा संकलन करणारी स्वयंभू ट्रान्स्पोर्ट कंपनी नगरला ब्लॅकलिस्टेड आहे. या कंपनीबाबत पुण्याच्या महापौरांनी ४३ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत असेही ते म्हणाले.

भाजप नगरसेवक बैसाणे यांनी महापालिकेत प्रशासन व ठेकेदार लुटण्याचे काम करत असल्याचा गंभीर आरोप केला. या विषयावर प्रशासनाने ‘अनभिज्ञ’ असल्यागत भूमिका घेऊन वेळ मारून नेली. दुसरीकडे सत्ताधारी सदस्यानेच समस्यांप्रश्‍नी आता सत्तेत असलेले भाजपचे ‘महिलाराज’ काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

स्थायी समितीची साप्ताहिक सभा महापालिका सभागृहात झाली. सभापती सौ. किरण कुलेवार, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, नगरसचिव मनोज वाघ, सदस्य, अधिकारी उपस्थित होते. सभापती कुलेवार यांच्या पत्रान्वये सभेपुढे मनपा क्षेत्रातील घनकचरा संकलन व वाहतूक प्रक्रियेबाबत निर्णय घेण्याचा विषय होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT