Sanjay Raut News : 'एक देश एक निवडणूक' कशाला ? निवडणुका पुढे ढकलण्यासाठी मोदींचे हे षडयंत्र...

One Nation One Election : आधी पारदर्शक निवडणुका घेऊन दाखवा..
Sanjay Raut News
Sanjay Raut NewsSarkarnama

Mumbai News : केंद्र सरकारने 'एक देश एक निवडणूक' यासाठी समिती स्थापन केली आहे. त्यावर विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. "देश एकच आहे, एकच निवडणुक कशासाठी?' असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला केला आहे. "आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका पुढे ढकलण्यासाठी केंद्र सरकारचे हे षडयंत्र आहे," असा आरोप राऊतांनी केला आहे. "आधी पारदर्शक निवडणुका घेऊन दाखवा," असे राऊत म्हणाले. (One Nation One Election News update)

Sanjay Raut News
Prashant Dikker News : शेतकऱ्यांना मदत करा, अन्यथा टोकाचं पाऊल उचलणार ; बेपत्ता प्रशांत डिक्करांचा व्हिडिओ व्हायरल..

'एक देश एक निवडणूक' साठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना त्याचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. त्याची अधिसूचना आज जारी होऊ शकते. ही समिती 'वन नेशन वन इलेक्शन'च्या कायदेशीर बाबी तपासणार आहे. सामान्य नागरिकांचे सूचना, हरकती घेतल्या जाणार आहेत.

संजय राऊत म्हणाले, "भष्ट्र निवडणूक आयोग असेपर्यत देशात एक देश एक निवडणूक होणार नाही. भ्रष्टाचारी निवडणूक आयोगाला आधी बाजूला करा मग निवडणुका घ्या. "वन नेशन वन इलेक्शन' ऐवजी पारदर्शक निवडणूक घेऊन घ्या. ही आमची मागणी आहे,"

Sanjay Raut News
Anil Bonde On Sanjay Raut: 'मोदी है तो मुमकीन है...' हे राऊत विसरले आहेत का ? अनिल बोडेंचा राऊतांना चिमटा

मणिपूरमध्ये निवडणुका घेऊन दाखवा..

"मोदी सरकारने 'एक देश एक निवडणूक' हा नवा फुगा हवेत सोडला आहे. देशात एकाच वेळी निवडणूक घेण्याआधी मणिपूर, जम्मू काश्मिरमध्ये निवडणुका घेऊन दाखवा," असे आवाहन राऊतांनी केंद्र सरकारला दिले आहे.

केंद्र सरकारला अचानक एक देश एक निवडणुकीची गरज का पडली? असा सवाल लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, पुन्हा एकदा संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी टि्वट करीत संसदेचे विशेष अधिवेशन पुढील महिन्यांत 18 सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com