Rahul Gandhi & Amit Shaha Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Amit Shah: अमित शहा यांची टीका, "राहुल गांधींना मागासवर्गीयांचे आरक्षण कमी करायचे आहे काय"

Amit Shah criticize Rahul Gandhi: भाजप नेते अमित शहा यांनी महाविकास आघाडीचे नेते महाराष्ट्राला पिछाडीवर नेतील असा दावा केला.

Sampat Devgire

Maharashtra Assembly election 2024: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी यांना आदिवासी आणि मागासवर्गीयांचे आरक्षण कमी करायचे आहे का? असा प्रश्न त्यांनी केला.

दोंडाईचा (धुळे) येथे भाजपचे उमेदवार जयकुमार रावल यांच्या प्रचारासाठी श्री शहा यांची सभा झाली. या सभेला मोठ्या प्रतिसाद मिळाला. भाजपचे विविध नेते यावेळी उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीच्या प्रचाराचा या नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील महायुतीच्या सरकारच्या कामकाजाचे कौतुक केले. या सरकारने अनेक लोकोपयोगी कामे सुरू केली आहेत. त्याला जनमानसातून चांगला प्रतिसाद आहे. या सरकारच्या लोकप्रियतेमुळे विरोधकांची धावपळ उडाली असल्याचे गृहमंत्री शहा म्हणाले.

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना महायुती सरकारने सुरू केली. या सरकारच्या योजनेमुळे महिलांना आर्थिक लाभ होत आहे. मात्र या योजनेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे टीका करीत आहेत. त्यांचा या योजनेला विरोध आहे. सामान्य आणि गरीब महिलांना फायदा होत असल्याने हा विरोध केला जात आहे का?, असा प्रश्न त्यांनी केला

गृहमंत्री शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. राहुल गांधी यांना मुस्लिम समाजासाठी आरक्षण हवे आहे. असे आरक्षण दिल्यास त्याचे दुष्परिणाम होतील. मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीय संवर्गातील आरक्षण कमी करणार का? असा प्रश्न त्यांनी केला.

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अतिशय चांगली कामगिरी केली आहे. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावर होती. गेल्या दहा वर्षात ती पाचव्या क्रमांकावर नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आहे 2027 मध्ये देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाईल. त्याचा लाभ देशातील सर्वच घटकांना होईल, असा दावा गृहमंत्री शहा यांनी केला.

आगामी काळात शेतीशी संबंधित उत्पादनांवरील जीएसटीचा कर कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. विविध योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना दिला जाईल. या लोकोपयोगी योजनांच्या लाभाच्या मर्यादेत देखील वाढ करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी आमदार जयकुमार रावल, माजी खासदार डॉ सुभाष भामरे, आमदार अमरीश पटेल, आमदार मंजुळा गावित, राम भदाणे, नगराध्यक्ष नयनकुमारताई रावल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, सरकार साहेब रावल यांसह विविध नेते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT