Amit Thakrey
Amit Thakrey Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MNS News: अमित ठाकरे यांच्या दौऱ्यात ‘वन टू वन’ चर्चा

Sampat Devgire

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी (MNS) सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thakre) यांचा आजपासून ९ ऑगस्ट पर्यंत नाशिक शहर (Nashik) व जिल्हा दौरा असून या दौऱ्यात युवक वर्ग जोडण्यासाठी महाविद्यालयात भेट देऊन वन- टू- वन चर्चा करणार आहे. या वेळी पदाधिकाऱ्यांना चर्चेत सहभागी करून घेतले जाणार नाही. विद्यार्थ्यांशी चर्चा करताना सदस्य नोंदणी मोहीमदेखील होणार आहे. (MNS leader Amit Thakrey on Nashik visit from today)

जून महिन्यात राज्यात घडलेल्या सत्तांतरानंतर पक्षाचे राजकीय ढब बदलत चालले आहे. नव्या पिढीला राजकारणात आणण्यासाठी आता नेते मैदानात उतरताना दिसत आहे. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे व तेजस ठाकरे मैदानात उतरत असताना दुसरीकडे मनसेकडून अमित ठाकरे नाशिकच्या मैदानात नवीन खेळण्यासाठी उतरत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरवात भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून झाली.

विद्यार्थी सेनेच्या शाखा खोलताना त्यांनी थेट संवाद साधला. परिणामी मनसेची स्थापना होत असताना तो वर्ग जोडला गेला. राज ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच अमित ठाकरे विद्यार्थी सेनेची मोट बांधताना दिसत आहे. त्यासाठी चार दिवस ते नाशिकमध्ये तळ ठोकून आहे. ६ ऑगस्टला इगतपुरी सिन्नर व नाशिक तालुक्यातील महाविद्यालयांना भेट देतील. ७ ऑगस्टला निफाड, येवला, नांदगाव, मालेगाव व चांदवड, तर ८ ऑगस्टला सटाणा देवळा, कळवण, दिंडोरी, हरसूल, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महाविद्यालयांना भेट देतील. ९ ऑगस्टला नाशिक शहरातील महाविद्यालयांना भेट देतील.

या वेळी विद्यार्थ्यांशी संवाद ते साधणार आहेत. पदाधिकारी अमित ठाकरे यांच्या सोबत राहतील, मात्र विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पदाधिकाऱ्यांना सहभागी करून घेतले जाणार नाही.

नाशिकमधून राजकारणाची तालीम

अमित ठाकरे राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्या अगोदर राजकारण व समाजकारणातले बारकावे माहीत असणे गरजेचे आहे. युवक वर्ग लक्ष्य करताना संवाद, भाषण शैली या राजकारणात महत्त्वाच्या ठरणाऱ्या बाबींची रंगीत तालीम या निमित्ताने होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT