Amruta Fadanvis |  Twitter@ Amruta Fadanvis
उत्तर महाराष्ट्र

फडणवीसांनतर आता अमृता फडणवीसही म्हणतात, मी पुन्हा येईन…मी पुन्हा येईन...

Amruta Fadanvis | भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवणं, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे.

सरकारनामा ब्युरो

Amruta Fadanvis मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानचा ‘मी पुन्हा येईन’हा डायलॉग चांगलाच प्रसिद्ध झाला होता. सोशल मिडीयावरही हा डायलॉग प्रचंड व्हायरल झाला. विशेष म्हणजे फडणवीस यांच्यानंतर आता त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनीही हाच डायलॉग एका कार्यक्रमात मारला आहे.

अमृता फडणवीस मंगळवारी (१५ नोव्हेंबर) अहमदनगरमधील जनसेवा फाउंडेशन लोणी व पंचायत समिती (राहाता) यांच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध योजनांची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून अमृता फडणवीस यांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या स्टाइलने ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ असा डायलॉग मारला.आता त्यांच्याही या डायलॉगची सोशल मिडीयावर चर्चा सुरु झाली आहे.

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अमृता यांना आधीच खुप उशीर झाला होता. यावेळी आपलं मनोगत संपवताना त्यांनी मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन असं म्हटलं आहे. यावेळी बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवणं, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे. ‘मेक इन इंडिया’ बनवणं हेही मोदींचं स्वप्न आहे. पण त्यांचं स्वप्न तेव्हाच साकार होईल, जेव्हा प्रत्येक स्त्री यामध्ये योगदान देईल. आपण सगळे मिळून भारतासाठी हे स्वप्न साकार करू, हे मला ठाऊक आहे. जेव्हा तुमचं कुटुंब सुखी, समाधानी राहील, तेव्हाच हे स्वप्न साकार होईल.

भाषणाच्या शेवटी अमृता फडणवीस म्हणाल्या, “मला या कार्यक्रमात पुन्हा यायचं आहे. मी पुन्हा येईन…मी पुन्हा येईन…मी पुन्हा येईन… कारण यावेळी मला फार मजा आली नाही. कारण येथे यायला मला खूप उशीर झाला. बरीच कामं होती. आता मी जातेय पण मी पुन्हा येईन.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT