Shivsena : अशा भुलथापांना यावेळी भुलणार नाही ; महागाईवरुन मोदी सरकारला शिवसेनेनं सुनावलं

Shivsena : , ‘देशातील महागाई कमी झाली हो! हे म्हणजे जनतेच्या मनात धूळ फेकण्यासारखं आहे,
sanjay raut
sanjay raut sarkarnama
Published on
Updated on

Shivsena : शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधून आज देशातील महागाईवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 'देशात ज्वारी, बाजरी, गहू, महाग. कडधान्ये आणि डाळीही कडाडल्या आहेत. खाद्यतेलही महागले आहे. रोजचा भाजीपालाही स्वस्त होईना. तरीही केंद्र सरकार म्हणत आहे की, ‘देशातील महागाई कमी झाली हो! हे म्हणजे जनतेच्या मनात धूळ फेकण्यासारखं आहे, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. महागाईवर भाष्य करीत मोदी सरकारला जबाबदार धरले आहे.

‘देशातील महागाई कमी झाली हो !!’ एकीकडे महागाईचा भडका उडाला आहे. सर्वसामान्यांची त्यात होरपळ होत आहे आणि दुसरीकडे सरकार त्यावर ‘कागदोपत्री ‘ फुंकर घालून जनतेची दिशाभूल करीत आहे . अर्थात जनता अशा भुलथापांना यावेळी भुलणार नाही हे सरकारने लक्षात घ्यावे ," असा इशारा अग्रलेखात देण्यात आला आहे.

sanjay raut
Suhas kande VS Dada Bhuse : कांदे-भुसे यांच्यातील विस्तव जाणार का ? ;कांदे-मुख्यमंत्री यांच्यात खलबते

सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे..

अमृत महोत्सवाचे फळ हेच म्हणायचे का?,

ग्रामीण जनतेचे अन्न असणारी ज्वारीदेखील 40 टक्क्यांनी महागली आहे. ज्वारीची भाकरी, चटणी, ठेचा आणि कांदा हे आपल्या देशातील गरीब माणसाचे अन्न. मात्र ज्वारीची भाकर तर त्याच्यासाठी ‘महाग’ झाली आहेच, मात्र पशुखाद्यासाठी वापरली जाणारी ज्वारी खाण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे फळ हेच म्हणायचे का?,

स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेता येते..

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी जी माहिती प्रसिद्ध केली त्यानुसार घाऊक आणि किरकोळ महागाई दरात घट झाली आहे. घाऊक महागाईचा दर तर तब्बल 18 महिन्यांनी एक अंकी आकडय़ात आला आहे. सरकारची ही आकडेमोड आणि आकडय़ांची जुळवाजुळव त्यांच्या नेहमीच्या कार्यपद्धतीचा भाग आहे. सरकारला स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेता येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com