Anandraj Ambedkar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Anandraj Ambedkar: उपवर्गीकरणावरून भाजप समर्थकांतही अस्वस्थता; आनंदराज आंबेडकरांचा महायुतीवर हल्लाबोल!

Nashik SC sub-categorization: अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला आनंदराज आंबेडकर यांनी विरोध केला. सरकारने निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करत त्यांनी पुढील आंदोलनाचा इशारा दिला.

Sampat Devgire

SC Reservation News: अनुसूचित जाती उपवर्गीकरणाचा वाद आता चांगलाच रंगला आहे. रिपब्लिकन युवासेने तर्फे या विरोधात शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी नेत्यांनी भाजपला टार्गेट केले. या विरोधात मातंग समाजा पाठोपाठ अन्य समाजांनी राज्य शासनाविरोधात मोर्चा काढला. रिपब्लिकन युवा सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी राज्य सरकारला इशारा दिला.

उपवर्गीकरणाचा विषय आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने अमान्य केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याचे अधिकार राज्य शासनाला दिले आहेत. असे असताना महाराष्ट्रात हा घाट का घातला जात आहे? असा प्रश्न यावेळी करण्यात आला.

विशेष म्हणजे आनंदराज आंबेडकर यांना भाजप समर्थक नेत्यांनीही साथ दिल्याचे स्पष्ट झाले. ॲड गुणरत्न सदावर्ते यांसह प्रा. जोगेंद्र कवाडे आणि अन्य पक्षाच्या नेत्यांनी या मोर्चात भाग घेतला. राज्य शासनाने उपवर्गीकरणाचा विषय रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आनंदराज आंबेडकर यांनी भाजप यासंदर्भात भांडणे लावण्याचे राजकारण करीत असल्याचा आरोप केले. आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा समाजामध्ये दोन्ही माजविण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले. तशीच स्थिती मातंग समाजाबाबत केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

राज्य शासनाने उपवर्गीकरणाबाबत तातडीने आपली भूमिका स्पष्ट करावी. हा विषय सोडून द्यावा. अनुसूचित जाती वर्गात एकोपा कायम ठेवण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत. हा एकोपा सत्ताधाऱ्यांच्या राजकारणाने कधीही मोडीत निघणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. राज्य शासनाने याबाबत आपला खेळ सुरूच ठेवल्यास नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात समाज मोठे शक्ती प्रदर्शन करेल असे आंबेडकर म्हणाले.

ॲड गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी महायुतीतील शिवसेना एकनाथ शिंदे पक्षावर गंभीर आरोप केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजामध्ये फूट पाडण्याचे राजकारण सुरू केले आहे. एकनाथ शिंदे यांनी हे धोरण थांबविले नाही, तर त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा सदावर्ते यांनी यावेळी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT