Centre Government`s Campaign Van Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Vs Farmers : भाजपचा संकल्प रथ शेतकऱ्यांनी गावाबाहेर हाकलला!

Sampat Devgire

Farmerd angry On Centre : दूरचित्रवाणीवर चेहरा पाहून कंटाळलो आहोत. आता नक्कोच तो फोटोअन् प्रचार. त्यांना सांगा उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या भाजपने शेतकऱ्यांना भीक मागण्याची वेळ आणली आहे, अशी संतप्त प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. (Farmers send back Centre Government`s Saklap rath workers &Vehicle)

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या येवला (Nashik) मतदारसंघातील ग्रामस्थांनी आज केंद्र शासनाच्या (Centre Government) योजनांच्या प्रचारासाठी आलेल्या संकल्प रथाला गावातून बाहेर काढले. याबाबतचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर तो चर्चेचा विषय ठरला.

केंद्र शासनाच्या योजनांच्या प्रचारासाठी तयार केलेला संकल्प रथ व त्यासोबत आलेल्या स्क्रीनींग व्हॅनसह सरकारी कर्मचाऱ्यांना आज कोटमगाव (येवला) येथे शेतकऱ्यांनी चांगलेच अपमानीत केले. प्रचारासाठी आलेल्या या व्हॅनला विरोध करीत आम्हाला तुमच्या कोणत्या योजना नकोत, कारण त्या फसव्या असतात. तुम्ही आमच्या गावात आलाच कशाला?. आम्ही राजकीय नेत्यांना गावात प्रवेश नाही, असा फलक लावला आहे तो तुम्हाला दिसला नाही का?. यांसह या कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी चांगलेच फैलावर घेतले.

ही व्हॅन गावातील चौकात आल्यावर त्यांनी ग्रामस्थांनी एकत्र येण्याचे आवाहन करायला सुरवात केली. तेव्हा जमा झालेल्या नागरिकांनी तुम्ही गावात आलेच कसे?. सरकार आमचे उत्पन्न दुप्पट करणार होते. मात्र एका रात्रीत निर्यातबंदी करून तुम्ही शेतकऱ्यांना भीक मागण्याची वेळ आणली. आम्हाला आता या सरकारचे काहीच नको आहे, असे सांगीतले. ग्रामस्थांची समजूत घालणाऱ्यांनाही जमलेल्यांनी खडे बोल सुनावत प्रचाराची व्हॅन गावाबाहेर काढली.

यावेळी ग्रामस्थ म्हणाले, तुमचा संकल्प विकसीत भारत आहे, मात्र सरकारचा चेहरा दूरचित्रवाणीवर पाहून आम्ही कंटाळलो आहोत. आता तो नकोच आहे. गावात देखील आणू नका. तुमचा विकास आम्हाला मान्य नाही. व्यापाऱ्यांचा विकास करणारे सरकार आहे. देशाचे वाटोळे करणारा हा माणूसच नको आता. रात्रीतून निर्यातबंदी करून आमचे उत्पन्न निम्मे केले. शेतकऱ्याचे पुर्ण वाटोळे केले आहे. त्यामुळे ज्यांनी पाठवले, त्यांना सांगा गावकरी येऊ देत नाहीत. महागाई आकाशालाभिडली. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या कितमी निम्म्या करा. बाकीच्या गोष्टींचं बोलूच नका. विनवणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अखेर परत जावे लागले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT