BJP Vs Farmers : चार हजाराची दारू चालते, मग ४० रुपयांचा कांदा महाग कसा?

Police detain Prahar Organisation`s Farmer going to Ministers House in Nashik City-कांदा निर्यातबंदीच्या निषेधार्थ केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्या घराकडे निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी रस्त्यातच अडवले.
Prahar Agitation & Dr. Bharti Pawar
Prahar Agitation & Dr. Bharti PawarSarkarnama
Published on
Updated on

Onion Farmers Politics : मतं मागायला आमच्या घरी येता, तोंडभरून आश्वासने देता आणि सत्तेत येताच शेतकऱ्यांना नागवता, त्यांना देशोधडीला लावता, भारतीय जनता पक्षाच्या सरकारला शेतकऱी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा प्रहार संघटनेच्या नेत्यांनी आज दिला. (Farmers warns BJP centre Government & Minister Dr. Bharti Pawar on Onion Export banned)

कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने शेतकरी (Farmers) संतप्त आहेत. प्रहार संघटनेच्या या संतप्त शेतकऱ्यांनी आज भाजपच्या (BJP) केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांच्या निवासस्थानी जाऊन निवेदन करण्याचे जाहीर केले होते. या शेतकऱ्यांना पोलिसांनी (Police) पवार यांच्या घरापासून तीन किलोमटरवर अडवले.

Prahar Agitation & Dr. Bharti Pawar
Maharashtra Politics : जिवावर उदार शेतकऱ्यांनी चक्क समृद्धी महामार्गच रोखला!

कांदा निर्यातबंदी हा जिल्ह्यातील अत्यंत गंभीर राजकीय विषय बनला आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांतील लिलाव बंद करण्यात आले आहेत.शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आंदोलन होत आहे. यासंदर्भात आज प्रहार संघटनेतर्फे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या निवासस्थानी जाऊन धरणे धरण्याचा इशारा दिला होता.

प्रहार संघटना व शेतकऱ्यांच्या या इशाऱ्यानंतर पोलिसांनी शहराततील अशोक स्तंभ येथे बॅरीकेडींग करून रस्ता बंद केला होता. या शेतकऱ्यांना त्यांनी रस्त्यातच रोखले. त्यामुळे हे शतकरी संतप्त झाले. चांदवडहून आलेल्या या शेतकऱ्यांनी आम्ही संकटात आहोत. डॉ. पवार आमच्या भागाच्या खासदार आहेत. त्यांना भेटल्याशिवाय आम्ही परतणार नाही, अशी भूमिका घेत रस्त्यातच धरणे धरले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. रस्ता वाहतूकीसाठी बंद करावा लागला.

यावेळी संतप्त शेतकरी म्हणाले, असे काय घडले की, केंद्र सरकारने एका रात्रीत कांदा निर्यातबंदी केली. आज भाजपचे लोक चैनीत जगत आहे. श्रीमंतांना एका दिवसांत चार हजाराची दारू लागते. ती दारू त्यांना चालते, मात्र ४० रुपये किलो कांदा महाग वाटतो. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देऊन त्यांच्या सरकारने आम्हाला कंगाल केले आहे. त्यामुळे जोपर्यंत कांदा निर्यातबंदी केली जात नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या गावी परतणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी शेतकऱ्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणानून गेला होता.

यावेळी जिल्हा अध्यक्ष गणेश निंबाळकर, महेश ठाकरे, राहुल जाधव, अमित जाधव, हरिभाऊ सोनवणे, रेवन गांगुर्डे, गमेश तिडके, बापू शेळके, रतन ठोंबरे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी सहभागी झाले होते.

Prahar Agitation & Dr. Bharti Pawar
BJP Vs Shivsena : टिपू सुलतानचे कौतुक करणाऱ्यांनी शिवसेनेची वाट लावली!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com