Anil Gote news: शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहायकाच्या खोलीत तब्बल तीस हजार फाईल्स सापडल्या आहेत. या सर्व फाइल्स सापडलेल्या रोकडशी संबंधीत आसतील का? याचा तपास पोलिसांनी करावा लागेल. या फाईल्सचा डोंगराचे उत्खनन पोलिसांना करावे लागणार आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार आणि विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या विश्रामगृहातील कक्षात तब्बल तीस हजार फाईल्स आढळल्या आहेत. या सर्व फाईल धुळे जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामांशी संबंधित आहेत.
या प्रकरणात दिवसेंदिवस विविध प्रकारची चर्चा होत आहे. त्यामुळे पोलिसांवर देखील दबाव वाढला आहे. त्यामुळे या प्रकरणातील मूळ तक्रारदार शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार अनिल गोटे यांचा जबाब अखेर सोमवारी नोंदविण्यात आला. या तपासात माजी आमदार गोटे यांनी धक्कादायक माहिती दिल्याचे कळते.
या प्रकरणातील दुसरा संशयित उदगीर (जालना) येथील राजू उर्फ राजकुमार व्यंकटराव मोगले (वय ३०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विश्रामगृहाच्या सीसीटीव्ही फुटेज आणि काही रजिस्टर तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे. हे फुटेज दहा दिवसांपूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार खोतकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तपासाची माहिती दिली. अधीक्षक धिवरे स्वतः या प्रकरणात लक्ष घालून आहेत. माजी आमदार अनिल गोटे यांनी या प्रकरणाबाबत मूळ तक्रार केली होती. त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानेच हे प्रकरण उघडकीस आले.
माजी आमदार गोटे यांनी गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील कक्ष क्रमांक १०२ या बाहेर ठिय्या मांडला होता. हा कक्ष आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावाने आरक्षित होता. याच कक्षात तीस फाईल्स आढळल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात कोण अडचणीत येते याची उत्सुकता लागली आहे.
या फाईल्सची प्राथमिक पडताळणी केली असता विविध रस्ते, मारुती, पाटबंधारे, पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि ग्रामीण भागातील विकास कामांच्या या फाईल्स आहेत. महापालिका, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशा विविध विभागांशी संबंधित फाईल्स किशोर पाटील यांच्या ताब्यात होत्या.
या फाईल्सशी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांच्याशी संपर्क झाला होता का? काही व्यवहार झाला आहे का? या प्रश्नांची उत्तरे पोलिसांना शोधण्याचे आव्हान आहे. तीस हजार फाइल्सचा डोंगर पोलिसांना पोखरावा लागणार आहे. यातील दुसरा आरोपी ताब्यात घेतल्याने या प्रकरणाला आता नवे वळण लागण्याची शक्यता आहे. त्याचा संबंध थेट राजकीय नेत्यांची आहे का? याची सगळ्यांना उत्सुकता आहे.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.