Nashik Kumbh Mela : 2003 मध्ये जे झालं ते चुकूनही नको व्हायला, यावेळी कुंभमेळ्यात गर्दी टाळण्यासाठी कसं केलय नियोजन?

Nashik Kumbh Mela 2026 focuses on advanced planning and crowd control : सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित १३ आखाड्यांच्या साधु-महंतांनी रविवारी (दि. १) नाशिक व त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर केल्या.
Nashik Kumbh Mela
Nashik Kumbh MelaSarkarnama
Published on
Updated on

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित १३ आखाड्यांच्या साधु-महंतांनी रविवारी (दि. १) नाशिक व त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर केल्या. त्यानुसार ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहणाने कुंभपर्वाला सुरुवात होणार आहे. २४ जुलै २०२८ पर्यंत कुंभमेळा चालेल.

कुंभमेळ्यानिमित्ताने लाखो भाविक नाशिक कुंभनगरीत दाखल होतील. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी खास नियोजन केलं गेलं आहे. विशेषत: काल नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील अमृतस्नानाच्या तारखा घोषित करताना त्यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. मागील कुंभमेळ्यात शाही स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. गर्दीवर नियंत्रित करणे हे मोठे आव्हान ठरले होते. त्यामुळे यंदा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे तिसरे अमृतस्नान स्वतंत्र दिवशी ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. नाशिकला ११ सप्टेंबर २०२७ व त्र्यंबकेश्वरला १२ सप्टेंबर २०२७ तारखेला तिसरे अमृतस्नान होईल.

२ ऑगस्टला नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये पहिल्या अमृतस्नानाची पर्वणी असणार आहे. नाशिकमध्ये तीन अमृत स्नानासह ४८ पर्व स्नान असतील. तर त्र्यंबकेश्वरमध्ये देखील तीन अमृतस्नान व ३२ पर्वस्नान असणार आहे. अमृत स्नानाच्या तारखा अधिक असल्याने एकाचवेळी गर्दी करण्याचे कारण नसेल. शिवाय २०२८ पर्यंत दोनवेळा गुरु वक्री होणार आहे. त्यामुळे यंदाचा कुंभपर्व कालावधी २२ महिन्यांचा असणार आहे. त्यामुळे गर्दी नियोजनाची संधी मिळणार आहे.

Nashik Kumbh Mela
Nashik Kumbh Mela : नाशिकमध्ये कुंभमेळा कधी? अखेर तारखा जाहीर

त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थस्थळी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्यामुळे, तेथील मर्यादित जागा लक्षात घेता पर्यायी व्यवस्था उभी करण्याच्या दृष्टीने साधू- महंतांमध्ये एकमत झाले आहे. या प्रस्तावावर लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल दिली आहे. सुरक्षित, सुव्यवस्थित व सुनियोजित कुंभमेळा करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

नाशिकमध्ये 2003 मध्ये कुंभमेळा भरला होता. त्यावेळी चेंगराचेंगरी झाली होती. त्यात कमीतकमी 30 लोकांचा जीव गेल्याची नोंद आहे. शिवाय, शंभरहून जास्त लोक जखमी झाले होते. नुकतेच प्रयागराजमध्ये झालेल्या महाकुंभात चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला. गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने प्रशासनाचे हाल झालेत. या सर्व घटना पाहाता नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात गर्दी नियंत्रणात राहील यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com