IPS Ankush Shinde & Sunil Phulari
IPS Ankush Shinde & Sunil Phulari Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Police transfer; अंकुश शिंदे नाशिकचे नवे पोलिस आयुक्त, सुनील फुलारी नवे आयजी

Sampat Devgire

नाशिक : पिंपरी चिंचवडचे (Pune) पोलिस आयुक्त अंकुश शिंदे (Ankush Shinde) हे नाशिकचे नवीन पोलिस आयुक्त (Police) म्हणून रूजू होणार आहेत तर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर (B. G. Shekhar) यांचीही बदली झाली असून त्यांच्या जागी सुनील फुलारी (Sunil Phulari) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. (Police officers transfers in Maharashtra state)

राज्य शासनाच्या गृह विभागामार्फत मंगळवारी रात्री महाराष्ट्र पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या, यामध्ये नाशिकचे पोलिस आयुक्त जयंत नाईक नवरे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांचीही बदली करण्यात आली आहे. सुनील फुलारी हे नाशिक परिक्षेत्राचे नवनियुक्त विशेष पोलिस महानिरीक्षक असतील. या बदल्या राज्याचे सहसचिव वेंकटेश भट यांच्या आदेशाने करण्यात आल्या आहेत.

शिंदे होते ग्रामीणचे अधीक्षक

नवनियुक्त पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासाठी नाशिक शहर आणि जिल्हा नवीन नाही. २०१६-१७ मध्ये अंकुश शिंदे हे नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक होते. येथूनच त्यांची पोलिस उप महानिरीक्षक म्हणून पदोन्नतीवर बदली झाली होती. श्री. शिंदे यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण गुन्ह्यांची उकल झाली होती.

फुलारी होते उपायुक्त

विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून रूजू होत असलेले सुनील फुलारी यांचाही नाशिकशी जवळचा संबंध राहिलेला आहे. फुलारी यांनीा २००७-०८ मध्ये नाशिक शहर पोलिस आयुक्तालयामध्ये उपायुक्त म्हणून कामगिरी बजावलेली आहे. कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT