Dada Bhuse News: पालकमंत्र्यांच्या प्रस्तावाला महापालिकेने दाखवला ठेंगा

Nashik News: पंचवटी, सिडको रुग्णालयासंदर्भात पालकमंत्री दादा भुसे यांची मध्यस्थी
Dada Bhuse
Dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : आमदार, खासदारांकडून (MLA Rahul Dhikle) मागणी केल्यास तसेच पालकमंत्र्यांनी (Guardian Minister) तातडीने दखल घेण्याची सूचना दिल्यानंतर महापालिका (NMC) प्रशासनाने तातडीने कारवाई अपेक्षित असते. मात्र, पंचवटी व सिडको विभागातील रुग्णालय संदर्भात सूचना देऊनही महापालिकेने कुठलीच हालचाल केली नाही. त्याचे पडसाद नियोजन समितीच्या (DPDC) बैठकीत उमटले. त्यावर आमदार चांगलेच संतापल्याने पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना तातडीने जागेचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना महापालिकेला द्याव्या लागल्या. (Guardian Minister Dada Bhuse given instruction to NMC for action)

Dada Bhuse
Suhas Kande News: तुमच्यासाठी जेलमध्ये जायला देखील तयार आहे!

महापालिका हद्दीमध्ये मध्य विधानसभा मतदारसंघ व नाशिक रोड भागांमध्ये सरकारी व खासगी रुग्णालयांची संख्या मोठी आहे. परंतु तुलनेने लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या पंचवटी व सिडको विभागात मात्र रुग्णालय नाही. ही बाब स्थानिक आमदारांनी शासनाच्या लक्षात आणून दिली आहे.

Dada Bhuse
Dada Bhuse; भुसेंच्या मतदारसंघात पेटला पाण्यासाठी नागरिकांतच संघर्ष

पूर्व विधानसभा मतदारसंघात आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी, तर सिडको विभागात सीमा हिरे यांनी रुग्णालयाची मागणी केली होती. पहिल्याच बैठकीत पालकमंत्री दादा भुसे यांनी हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. परंतु महापालिकेकडून या संदर्भात कुठलीच हालचाल झाली नाही.

राज्य शासनाकडून निधी मिळत असताना महापालिकेला फक्त जागेचा प्रस्ताव देणे आवश्यक आहे. तीदेखील व्यवस्था न झाल्याने नियोजन समितीच्या बैठकीत त्याचे पडसाद दिसून आले. आमदार राहुल ढिकले यांनी पंचवटी विभागातील रस्त्यांसंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी जागा निश्चित केल्याचे सांगितले, तर हाच धागा पकडून आमदार हिरे यांनीदेखील सिडकोतील रुग्णालया संदर्भात प्रश्न उपस्थित केला.

प्रस्ताव द्या, निधीची तरतूद

रुग्णालयांच्या जागेसंदर्भात महापालिकेने तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी केल्या महापालिकेकडून प्रस्ताव आल्यास जागा निश्चिती करून रुग्णालयांसाठी निधीची तरतूद करण्याचे आश्वासन श्री भुसे यांनी दिले. दरम्यान, योजनेअंतर्गत ४२ कोटी रुपये प्राप्त होऊनही नियोजन होत नसल्याची तक्रार केल्यानंतर बंद दाराआड चर्चा करून भुसे यांनी आमदारांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र या निमित्ताने आमदारांमधील खदखद समोर आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com