Shivram Patil Anna Hazare : Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Anna Hazare : अण्णा उठा ! शिवराम पाटलांनी गाठलं राळेगणसिद्धी ; डोळ्यात डोळे घालून दिली 'वोट चोरीची' माहिती

Shivram Patil Anna Hazare : जळगाव जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी थेट राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेतली. राहुल गांधींना सपोर्ट करा म्हणून आवाहन केलं.

Ganesh Sonawane

Anna Hazare : काँग्रेस पक्षाचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी वोट चोरीचा मुद्दा उपस्थित करत निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं आहे. त्यावरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आवाज उठवावा या मागणीचे बॅनर पुण्यात लागले होते. त्यावर माझं वय झालंय आता तरुणांनी पुढे यायला हवं, असे आवाहन अण्णा हजारेंनी केलं होतं. दरम्यान अण्णाचे माजी सहकारी समाजसेवक शिवराम पाटील यांनी थेट राळेगणसिद्धीला जाऊन अण्णांची भेट घेतली. त्यांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांना 'वोट चोरी ' संदर्भात माहिती दिली.

अण्णा हजारेंची भेट घेऊन आल्यानंतर जळगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटलांनी माध्यमांशी बोलताना सर्व माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल की त्यांनी या भेटीत अण्णा हजारे यांना राहुल गांधींच्या आंदोलनाची माहिती दिली. तसेच त्यांनी राहुल गांधींच्या या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहनही अण्णा हजारे यांना केलं आहे. पाटील अण्णांना म्हणाले, देशात पार पडलेल्या निवडणुकांमध्ये मतदानात निवडणूक आयोगाने मोठी हेराफेरी केली आहे. ही हेराफेरी राहुल गांधी यांनी कागदोपत्री शोधून काढली आहे. त्यांनी याचा डॉक्यूमेंट्री पुरावा कोर्टात दिला. एका माणसाला ५० मुले दाखवली. एका घरात त्यांनी ६० लोकं दाखवली. हे सर्व मुद्दे मी आण्णापुढे ठेवले. या गोष्टींना विरोध करावा म्हणून मी आण्णांना विनंती केल्याचं शिवराम पाटलांनी सांगितलं.

शिवराम पाटील आण्णांना म्हणाले, आण्णा तुम्ही आमचे पितामह आहात. तुमच्यामुळे आमचे स्वातंत्र्य अबाधित राहिलं आहे. तुम्ही मागच्या वेळेला भाजप, आरएसएस, अरविंद केजरीवाल यांना मदत केली. आंदोलन केलं. राहुल गांधी हे सुद्दा लोकांचे नेते आहेत. त्यांचा मुद्दा बरोबर आहे. मुद्दा जर बरोबर असेल तर लोकशाही वाचविण्यासाठी आतादेखील तुम्ही साथ द्यायला हवी असं मी आण्णांना सांगितल्याचं पाटील म्हणाले.

तरी तुम्ही उठत नाही हे चुकीचं..

अण्णा हे भाजपचेच आहे असं लोक म्हणतात. ते मला सहन होत नाही. समाज सेवक एखाद्या पार्टीशी संबधित कसा असू शकतो तर मुळीच नाही. समाज सेवकाने सगळ्या पार्टींना सारख्या अंतरावर ठेवलं पाहीजे. लोकशाही वाचवण्याच्या दृष्टीने आण्णानी सहभाग घेतला पाहीजे. तेव्हाच तुम्ही प्रामाणिक व निरपेक्ष आहात असा समज राहील असं पाटील म्हणाले. एक नागरिक म्हणतो की तुम्ही झोपेतून उठा आणि तरी तुम्ही उठत नाही हे चुकीचं आहे. वय झालं काही हरकत नाही. आम्हाला तुमच्याकडून आशा आहे असे शिवराम पाटील म्हणाले.

अण्णा भाजपच्या नजरकैदेत

अण्णा भाजपच्या नजरकैदेत आहेत असा आरोप यावेळी शिवराम पाटलांनी केला. आण्णाचे संरक्षण करणे पोलिसांचे काम आहे. आण्णांना कुणाशी भेटू न देणे, बोलू न देणे हे पोलिसांचे काम नाही. हा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न आहे. अण्णांच्या बाबतही मला तसा संशय येतो. त्यांचा शांत पणा नैसर्गिक नसून दबावाखाली आहे, असंही पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT