Kiran Kale Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Politics : 150 कोटींचा रस्ते घोटाळा; काँग्रेसच्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंध 'अ‍ॅक्शन मोड'वर

Pradeep Pendhare

Ahmednagar News : अहमदनगर शहर महापालिका क्षेत्रातील सुमारे 776 रस्त्यांच्या कामांमध्ये निकृष्ट कामे करत गुणवत्तेचे बनावट थर्ड पार्टी रिपोर्ट, टेस्ट रिपोर्ट तयार करून सुमारे 150 कोटी रुपयांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार अहमदनगर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली होती.

या तक्रारीची दखल घेण्यात आली, असून तक्रारीसंदर्भात जबाब नोंदवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधाने किरण काळे यांना बोलवले आहे. लाचलचुत प्रतिबंध विभागाच्या अहमदनगर कार्यालयाचे पोलिस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांनी किरण काळे यांना पत्र पाठवले आहे. किरण काळे यांच्या जबाबात काय-काय येते, याची आता उत्सुकता आहे.

अहमदनगर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अप्पर पोलिस (Police) महासचंलाक निश्वास नांगरे पाटील यांची 28 नोव्हेंबरला तक्रार केली होती. मुंबई इथं समक्ष भेट घेत दाखल केली होती. याप्रकरणाची आता लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई सुरू केली आहे. तक्रारदार किरण काळे यांना आपला जबाब नोंदवण्यासाठी पत्र पाठवत बोलविले आहे. यामुळे मनपा प्रशासन, या भ्रष्टाचारात गुंतलेले कंत्राटदार आणि त्यांना पाठबळ देणारे राजकीय नेते यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अहमदनगर कार्यालयाचे पोलिस उपअधीक्षक अजित त्रिकुटे यांनी काँग्रेसचे (Congress) किरण काळे यांना लेखी पत्र दिले असून त्यात नमूद केले आहे की, आपण 2016 ते 2023 या कालावधीतील अहमदनगर महापालिकेतील आयुक्त व संबंधित कामाशी निगडित इतर अधिकारी यांचेविरुद्ध दिलेल्या तक्रार अर्ज मुख्यालय यांच्याकडील 24 जानेवारी 2024 आणि परिक्षेत्रीय कार्यालयाकडील 24 जून 2024 रोजीच्या पत्रानुसार चौकशीसाठी प्राप्त झाला आहे. सदर तक्रारीनुसार आपल्याकडे चौकशी करणे असल्याने आपण आपले म्हणणे सादर करण्याकरिता आपल्या कडील पुराव्यांसह आज मंगळवारी 8 ऑक्टोबरला लाचलुचपत प्रतिबंधकच्या अहमदनगर कार्यालयात उपस्थित राहावं, असे म्हटलं आहे.

किरण काळे म्हणाले, "अहमदनगर शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेला निकृष्ट कामे कारणीभूत आहेत. अधिकारी, ठेकेदार आणि त्यांना पाठीशी घालणारे महापालिकेतील काही लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी यांनी संगनमत करून बनावट गुणवत्ता प्रमाणपत्र जोडून त्या आधारे खोटी कागदपत्र तयार करून घेतली आहे". अहमदनगर शहराला खड्ड्यात घालत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. यामुळे सर्वसामान्य नगरकर मात्र जीव मुठीत धरत रोज खड्ड्यांमधून प्रवास करत आहेत. नगरकरांना खड्ड्यात घालणाऱ्यांची जागा तुरुंगात असून चौकशीतून कुणी ही सुटणार नसल्याचे काळे यांनी म्हटले आहे.

काळे बुधवारी पुरावे सादर करणार

किरण काळे यांना मंगळवारी हजर होणे शक्य नसल्यामुळे बुधवारी त्यांच्याकडे उपलब्ध असणारे माहिती अधिकारातील सर्व पुरावे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलिस उपअधीक्षकांना सादर करून त्यांना या भ्रष्टाचाराबद्दल सविस्तर माहिती देत त्यांचा जबाब नोंदविणार आहेत. यामुळे रस्ते घोटाळ्यात गुंतलेल्यांचे धाबे दणाणले असून पुढे काय कारवाई होते याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT