Dr Apurv Hiray, Dada Bhuse & Adway Hiray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Apurva Hiray Politics: माजी आमदार अपूर्व हिरे यांचा दादा भुसे यांना चेकमेट?, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेशाची चर्चा!

Apurva Hiray; Apoorva Hire will create a dilemma for Dada Bhuse, may join Shiv Sena Shinde party-मंत्री दादा भुसे यांच्याकडून राजकीय दबावातून कारवाई टाळण्यासाठी अपूर्व हिरे यांची थेट उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी भेट

Sampat Devgire

Apurv Hiray News: सध्या राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराची लाट आली आहे. विरोधी पक्षातील प्रबळ नेत्यांना सत्ता आणि यंत्रणांच्या माध्यमातून त्रस्त केले जात आहे. यातूनच अपेक्षित नेत्यांचा सत्ताधारी पक्षात प्रवेश घडविला जात असल्याचा आरोप होत आहे.

या आरोपाला पुष्टी देणारी घटना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याच मतदार संघात घडण्याची चिन्हे आहेत. मंत्री दादा भुसे आणि हिरे कुटुंबीय यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला आहे. यातूनच होणाऱ्या कारवाई पासून संरक्षणासाठी हिरे कुटुंबीयांनी मास्टर स्ट्रोक खेळण्याच्या तयारीत आहेत.

माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अपूर्व हिरे यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. याच वेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. कार्यकर्त्यांशी बोलून आपण लवकरच पुढचा निर्णय घेणार असल्याचे त्यांच्या निकटवर्ती यांनी सांगितले.

मालेगाव बाह्य मतदार संघात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे मंत्री दादा भुसे यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांच्यात लढत झाली होती. अद्वय हिरे हे मंत्री भुसे यांचे राजकीय शत्रू असल्याने त्यांच्यात टोकाचा संघर्ष गेले काही दिवस सुरू आहे. त्यामुळेच मंत्री भुसे यांच्याकडून अद्वय हिरे आणि त्यांच्या शिक्षण संस्थेविरोधात अनेक केसेस दाखल करण्यात आले आहेत.

हिरे कुटुंबीयांचा शैक्षणिक संस्थेवर राजकीय संघर्षातून सातत्याने दबावाचे वातावरण आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी माजी आमदार अपूर्व हिरे यांनी यापूर्वीही भाजपच्या काही नेत्यांची सलगी करण्याचा प्रयत्न केला होता. याच पार्श्वभूमीवर त्यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीने मालेगावचे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

माजी आमदार हिरे यांनी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केल्यास त्यांचे कट्टर विरोधक मंत्री भुसे आणि हिरे दोघेही एकच पक्षात येतील. सत्ताधारी शिवसेना शिंदे पक्षाला त्यामुळे मालेगाव बाह्य मतदारसंघात विरोधक शिल्लक राहण्याची शक्यता नाही. यातून दादा भुसे यांची राजकीय कोंडी होण्याची देखील शक्यता आहे.

माजी आमदार हिरे यांचे बंधू अद्वय हिरे हे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते आहेत. त्यांनी सातत्याने मंत्री भुसे यांना राजकीय आव्हान देण्याचे काम केले आहे. यापूर्वीही हिरे कुटुंबीयांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना अशा विविध पक्षांमध्ये काम केले आहे. अपूर्व हिरे यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केल्यास दोन भाऊ एकमेकांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या गटात काम करतील असे चित्र आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT