Chhagan Bhujbal Politics: छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; म्हणाले, ‘मुलांवर हिंदीचा बोजा लादू नका’

Chhagan Bhujbal;Chhagan Bhujbal advises not to burden young children with Hindi -हिंदी भाषा सक्ती वरून राज्यात राजकारण तापल्याने भाजपला अंतर्विरोध सहन करावा लागत आहे.
Chhagan-Bhujbal
Chhagan-BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal News: महायुती सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचे सुतोवाच केले आहे. त्यावरून राज्यभरात प्रचंड विरोध होत आहे. विशेषतः विरोधकांना एक मोठा राजकीय मुद्दा हाती लागला आहे.

तीन भाषा स्वीकारण्याचे धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. त्याला सर्व थरातून प्रचंड विरोध होत आहे. विरोधी पक्षांनी हिंदीची सक्ती थांबवा, असे आवाहन सरकारला केले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी याबाबत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे आता व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देखील राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. ते म्हणाले, आपल्याकडे चित्रपट, सिनेमा आणि अन्य माध्यमातून सतत हिंदी कानावर पडत असते. मला गरज आहे त्याला हिंदी येते आहे. असे असताना हिंदीची सक्ती का करायची?.

Chhagan-Bhujbal
Nashik BJP : नाशिकमध्ये पोस्टरवॉर ! सीमा हिरे-बडगुजर समर्थकांमध्ये उघड रस्त्यावर संघर्ष

पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करणे पटणारे नाही. लहान मुलांवर भाषेचा बोजा लादू नये. त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. या संदर्भात भाषा तज्ञ तसेच साहित्यिकांनी देखील हीच भूमिका मांडली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांनीही हेच मत व्यक्त केले आहे.

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी देखील आता त्यासाठीच राज्य शासनाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेकांच्या भेटी घेतल्या आहेत. मात्र याबाबत सक्ती लादू नये, असे माझे मत आहे. या विषयावर आलेल्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सर्वांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हिंदी भाषेची सक्ती हा विषय एवढ्या गांभीर्याने घ्यावा असे आता राहिले नाही.

आगामी विधिमंडळाच्या अधिवेशनात हिंदी भाषेच्या सक्तीविषयी विरोधी पक्षांकडून सरकारला कोंडीत पकडले जाईल का? या प्रश्नावर देखील मंत्री भुजबळ यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले हिंदी भाषेची शक्ती होणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. राज्यात शेतकरी, आवर्षण, कांदा पिकाचे नुकसान, शेतकरी आत्महत्या यांसह शेकडो विषय महत्त्वाचे आहेत. विधिमंडळात त्यावर चर्चा होईल. असे विषय प्रत्येक अधिवेशनात येतच असतात असेही त्यांनी सांगितले.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com