Prakash Ambedkar VBA Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Prakash Ambedkar : 'महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचे सुचवलं जातंय', प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली भीती

Pradeep Pendhare

Prakash Ambedkar News :काही लोकांकडून महाराष्ट्राचा मणिपूर होईल का? असा मुद्दा उपस्थित करून महाराष्ट्राचा मणिपू र करा ! सुचवलं जातंय. यातून ते आपल्यात भांडण लावण्याचे काम करत आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव न घेता केला.

महाराष्ट्रात मराठाविरुद्ध ओबीसी, अशी राजकीय लढाई सुरू आहे. यातून ते आपले भांडण लावण्याचे काम करत आहेत. मात्र, आपल्या गावातले वातावरण बिघडणार नाही, याची दक्षता आपण घेतली पाहिजे, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.

राजकीय भांडणात तेल ओतण्याचे काम महाराष्ट्रात मराठा विरूद्ध ओबीसी राजकीय लढाई, अशीच राहिली तर मराठा समाज ओबीसीला मतदान करणार नाही. ओबीसी मराठा समाजाला मतदान देणार नाही. पण, हे राजकीय भांडण आहे आणि यामध्ये तेल ओतण्याचे काम सुरू असल्याचा घाणाघात प्रकाश आंबेडकर यांनी केला.

हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याची चाल नाकारता येत नाही. त्यामुळे मुस्लिम बांधवांनी अजून दोन महिने सहन करा. 'दो महिने के बाद स्टेट के चुनाव है, जिसको जगह बताना है, उसे जगह बता दो!' आपण आता ओबीसी आरक्षणाची लढाई व ओबीसी राजकीय चेहर्‍याची सुरवात करू, असे आंबेडकर यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून निघालेली एससी, एसटी, ओबीसी आरक्षण बचाव यात्रा जामखेड शहरात आली असता भारतीय बौद्ध महासभा, मुस्लिम पंच कमिटी जामखेड, ग्रामस्थ तसेच वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषात स्वागत केले.

या रॅलीची सांगता 7 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते अरुण जाधव, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, बापूसाहेब ओव्हळ, तालुका अध्यक्ष अतिश पारवे, मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अझहर काझी, सुरेखा सदाफुले उपस्थित होते.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT