Eknath Khadse
Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

दहा ट्रक कागदपत्रे घेऊन जा, पण अगोदर गुन्हा नोंद करा!

Sampat Devgire

जळगाव : जिल्हा दूध संघाने (Jalgaon Milk Fedration) दाखल केलेल्या तक्ररीची (FIR) अद्यापही नोंद केलेली नाही आणि जिल्हा दूध संघात तपास सुरू आहे. पोलिस (Police) नेमका कशाचा तपास करीत आहे, त्यांनी दहा ट्रक कागदपत्रे (Documents) घेऊन जावीत; परंतु गुन्हा आगोदर नोंद करावा, याबाबत आम्ही न्यायालयात अवमान याचिकाही दाखल केली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दिली. (Eknath Khadse made alligation on police inquiry of Milk fedration)

शहर पोलिसांकडून जिल्हा दूध संघाची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी संघात जाऊन काही कागदपत्रे ताब्यात घेतली. याबाबत माहिती देताना खडसे म्हणाले, की जिल्हा दूध संघात पोलिस पाच वर्षांच्या कागदपत्रांची तपासणी करीत आहेत.

वास्तविक हा चोरीचा गुन्हा दाखल आहे, मग त्या अनुषंगाने त्यांनी केवळ स्टॉकची तपासणी करावी, त्यांना पाच वर्षांतील कागदपत्रे कशासाठी हवी आहेत. मात्र न्यायालयाने आदेश दिला आहे, की त्यांना कागदपत्रे हवी असल्यास त्यांनी प्रत्येक कागदाची झेरॉक्स करून त्यावर पोलिस ठाण्याचा शिक्का मारून त्याची पोच देऊन ती घेऊन जावीत. पोलिसांना आमची कागदपत्रे देण्यास कोणताही नकार नाही. परंतु त्यांनी प्रथम आम्ही दाखल केलेला चोरीचा गुन्हा दाखल करावा त्यानंतर आवश्‍यकता वाटल्यास दहा ट्रक कागदपत्रे घेऊन जावीत, असे मतही खडसे यांनी व्यक्त केले.

अवमान याचिका दाखल

न्यायालयाने जो आदेश दिला आहे, त्याप्रमाणे पोलिस कारवाई करीत नाहीत, असा आरोप करून आमदार खडसे म्हणाले, की त्यामुळे आम्ही पोलिसाविरुद्ध न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. सध्या न्यायालयाला दिवाळीची सुटी आहे. त्यानंतर आम्ही केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी होईल.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT