Jalgaon News : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षात झालेल्या अंतर्गत बैठकीत पक्षांच्या रावेर मतदारसंघातील उमेदवार खासदार रक्षा खडसे व कार्यकर्ते यांच्यात नेते गिरीश महाजन यांच्यासमोरच झालेल्या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या नवीन कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी पक्षाचे नेते गिरीश महाजन,आमदार मंगेश चव्हाण, आमदार सुरेश भोळे, जळगाव लोकसभा मतदारसंघात संघाच्या उमेदवार स्मिता वाघ यांची उपस्थिती होती. या अंतर्गत बैठकीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
यात एक कार्यकर्ता रक्षा खडसे यांच्याशी वाद करीत असल्याचे दिसत आहे, तुम्ही एकनाथ खडसे यांचे नाव घेता, गिरीश महाजन यांचे नाव का घेत नाही?असा प्रश्न विचारताना दिसत आहे. प्रत्येकवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विचारात घेतले जाते, आम्हाला विचारात घेतले जात नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या व्हिडिओत रक्षा खडसे कार्यकर्त्याला समजून सांगताना दिसत आहेत, तर गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण कार्यकर्त्याला शांत करताना दिसत आहेत. आम्ही पक्षाचा प्रचार करणारच आहोत. पण स्थानिक उमेदवाराने आम्हाला मदत करणे गरजेचे आहे, असे मतही कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याचे दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे आता पक्षात खळबळ उडाली आहे.
Edited By : Umesh Bambare
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.