Satara Loksabha News: सातारा लोकसभेत ट्विस्ट; गिरीश महाजन- शिवेंद्रसिंहराजेंमध्ये खलबतं; 'या' मागणीसाठी लावला जोर

Girish Mahajan - Shivendraraje Bhosale Meeting : आमदार शिवेंद्रराजे यांनी भाजपची राजकीय ताकद वाढलेली पाहून हा मतदारसंघ भाजपलाच दिला जावा आणि हा निरोप वरिष्ठापर्यंत निश्चितपणे पोहोचला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
Girish Mahajan -  Shivendraraje Bhosale
Girish Mahajan - Shivendraraje Bhosale Sarkarnama
Published on
Updated on

Satara Loksabha News : केंद्राचे तसेच प्रदेश कार्यकारिणीचे कार्यक्रम सातारा जिल्हा भाजप कार्यकारिणीने वेळोवेळी राबवून बूथ संघटनापासून प्रदेश पातळीपर्यंत अत्यंत चांगले काम केले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात भाजपची ताकद प्रचंड वाढलेली आहे. परिणामी सातारा लोकसभा मतदारसंघ हा भाजपकडेच राहावा, अशी आग्रही मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली.

माढा- सातारा -पुणे या तीन लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या महाजन यांनी माढा लोकसभेच्या दौऱ्यानंतर सोमवारी साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चाळीस मिनिटे चर्चा केली. त्यानंतर महाजन यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सुरुची येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

Girish Mahajan -  Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale News : उदयनराजेंचे सूचक वक्तव्य; म्हणाले, मी काय संन्यास घेणार नाही, लढणारच...

गिरीश महाजन म्हणाले, सातारा- माढाच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षासाठी राजकीय समीकरणे कशा स्वरूपाची आहेत, याकरिता मी वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघांच्या दौऱ्यावर असल्याचे त्यांनी सांगितले.आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना लोकसभा निवडणुकीमध्ये अजिबात स्वारस्य नसल्याचे गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सांगितले.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व गिरीश महाजन यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. या चर्चेच्या दरम्यान शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवलेली आहे. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघ हा भाजपकडे राहिला पाहिजे, अशी भावना व्यक्त केली. त्याचबरोबर साताऱ्यातून तिकीट कोणाला द्यायचे हा सर्वस्वी निर्णय पक्षाचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (ShivendraRaje Bhosale) यांचे सातारा विधानसभा मतदारसंघांत वेगळे वर्चस्व राहिले आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षाचा कार्यक्रम आणि आदेश हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा असून, पक्ष देईल ते जबाबदारी पार पाडण्यासाठी नेहमीच तयार असतात. पश्चिम महाराष्ट्राचा राजकीय कल जाणून घेण्यासाठी दौऱ्यावर असणाऱ्या महाजन यांनी सुरुची आणि जलमंदिर येथे दोन्ही राजेंची भेट घेऊन परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आमदार शिवेंद्रराजे यांनी भाजपची राजकीय ताकद वाढलेली पाहून हा मतदारसंघ भाजपलाच दिला जावा आणि हा निरोप वरिष्ठापर्यंत निश्चितपणे पोहोचला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Girish Mahajan -  Shivendraraje Bhosale
Mohite Patil Vs Nimbalkar : मोहिते पाटलांच्या शक्तिप्रदर्शनाला निंबाळकरांची ‘टशन’; शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आमदारांची बैठक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com