Nashik News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik MVA News : भाजप हटाव, देश बचाव 'इंडिया'च्या बैठकीला पाठिंबा ; नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा जल्लोष !

सरकारनामा ब्यूरो

Nashik Politics News : देशातील मातब्बर नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत 'इंडिया' आघाडीची बैठक होत आहे. या बैठकीला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमध्ये महाविकास आघाडीसह काँग्रेस पक्षाच्या वतिने आनंदोत्सव साजरा करत एकमेकांना पेढे भरवले. 'जितेगा भाई जितेगा इंडिया जितेगा, 'मोदी हटाव, देश बचाव, 'भाजप हटाव देश बचाव' 'भारत माता की जय' 'जितेगा भारत जितेगा इंडिया' अशा घोषणा देण्यात आल्या.

महात्मा गांधी रोडवरील काँग्रेस (Congress) पक्षाच्या कार्यालयासमोर फटाके फोडून पेढे वाटण्यात आले. पक्षाचे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोष झाला. यावेळी शिवसेनेचे (Shivsena) शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महापालिकेचे माजी गटनेते विलास शिंदे, ज्येष्ठ नेते जयंत दिंडे, माकपचे नेते डी. एल. कराड, राजू देसले, सचिन मालेगावकर यांसह राष्ट्रवादीचे नेते गजानन शेलार सहभागी झाले होते.

कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत या बैठकीचे स्वागत केले. पक्षाचे झेंडे हातात घेवून जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. काँग्रेसच्या नेत्यांमध्ये राहुल दिवे, ज्ञानेश्वर काळे, संदीप शर्मा, भालचंद्र पाटील, वत्सला खैरे, स्वाती जाधव, कुसुम तडवी, आशा तडवी, जावेद शेख, संजय खैरनार, अमोल वरसाटे अल्तमस शेख उपस्थित होते.

दरम्यान, 'इंडिया' आघाडीची दोन दिवसीय बैठक मुंबईमध्ये होत आहे. या बैठकीसाठी देशभरातील विरोधी पक्षाचे नेते मुंबईत (Mumbai) दाखल झाले आहेत. या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार असून विविध मुद्द्यावर चर्चाही केली जाणार आहे. 'इंडिया' आघाडीचे संयोजक कोण असणार आणि जागा वाटप कसे होणार या विषयांवर चर्चा होण्याची शक्याता आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT