Rajnath Singh News : सहिष्णू भारत : संयमित संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ; अर्धातास केली साई दर्शनासाठी प्रतीक्षा !

Rajnath Singh Shirdi tour : राजनाथ सिंह यांनी सहिष्णू भारताची असलेली ओळख ही परंपरा आज (31 ऑगस्ट) शिर्डीत साई समाधी मंदिर दर्शना निमित्ताने दाखवली.
Rajnath Singh News
Rajnath Singh NewsSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : देशाचे संरक्षण मंत्रीपद हे महत्वाचे पद आहे. या पदावर असलेल्या व्यक्तीला केवळ देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर संरक्षण दृष्ट्या स्वयंपूर्ण भारताचे संरक्षण मंत्री म्हणून वेगळा लौकिक आणि महत्व असते. मात्र, असे सगळे असताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सहिष्णू भारताची असलेली ओळख ही परंपरा आज (31 ऑगस्ट) शिर्डीत साई समाधी मंदिर दर्शना निमित्ताने दाखवली.

राजनाथ सिंह यांना केंद्रीय सुरक्षा रक्षकांचा गराडा आणि त्याचबरोबर राज्यातील विविध सुरक्षा यंत्रणांची सुरक्षा असताना साई दरबारी आलेल्या साई भक्तांना आपल्यामुळे कोणताही व्यक्तय येत ताटकळत बसू लागू नये म्हणून स्वतः तब्बल चाळीस मिनिटे प्रतीक्षा गृहात थांबणे पसंत केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आदी नेते मंडळी त्यांच्यासोबत संस्थानच्या प्रतीक्षा गृहात थांबून होते.

Rajnath Singh News
Supriya Sule News : मुंबईचा कारभार PMO कडून चालवला जाणार का ? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल

राजनाथ सिंह (Rajnath Singh) आज दुपारी 12 च्या सुमारास शिर्डी जवळील काकडी विमानतळावर पोहचले. त्यांच्या ताफ्याला साई मंदिरात पोहचण्यास साधारण पंधरा मिनिटे लागली. मात्र, याच वेळी साईंची नियमित होणारी माध्यान्ह आरती बारा वाजता सुरू झाली. गुरुवार असल्याने शिर्डीत साई भक्तांची गर्दी हजारोंच्या संख्येने असते.

अशात साई मंदिर आणि परिसरात मोठी गर्दी असल्याने राजनाथ सिंह यांनी मंदिरात लागलीच न जाता माध्यान्ह आरती होईपर्यंत आणि त्यानंतर गर्दी बाहेर पडेपर्यंत जवळपास चाळीस मिनिटे संस्थानच्या एक नंबर प्रतीक्षालयात थांबणे पसंत केले. तशा सूचना त्यांनीच दिल्या. मंदिरातील दुपारच्या आरतीची गर्दी बाहेर निघाल्यानंतर त्यांनी साई समाधी आणि मूर्तीचे विधिवत आरती करत दर्शन घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

Rajnath Singh News
Dhananjay Munde Rakshabandhan: 'पाणी डोळ्यात तुझ्या जिव माझा जाई' ; मुंडे भगिनींनी राखी बांधल्यानंतर धनंजय मुंडेंच्या भावना

अनेक व्हीव्हीआयपी आणि नेते मंडळी, सेलिब्रिटी आदींसाठी दर्शनरांग थांबवून महत्वाच्या लोकांना दर्शन दिले जाते. अशा वेळी तासंतास ताटकळत रांगेत उभे असलेल्या सामान्य भक्तांच्यात नाराजी उमटते. मात्र, आज राजनाथ सिंह यांनी स्वतःच वेटिंग करत भक्तांना अडचण होणार नाही, याची काळजी घेतल्याने याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com