Rohit Pawar Vs Radhakrishna Vikhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rohit Pawar Vs Radhakrishna Vikhe : तलाठी भरतीतील गैरप्रकारांची 'ती' गोपनीय फाईल; आमदार पवारांनी मंत्री विखेंना दिले आव्हान

Pradeep Pendhare

Talathi Bharti News : राज्यात तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाले. आमदार रोहित पवार यांनी या भरती प्रक्रियेवर शंका उपस्थित थेट आरोप केले होते. आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता.

यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी रोहित पवार यांच्यावर कायदेशीर कारवाईचे संकेत दिले आहेत. आजही मंत्री विखे कायदेशीर कारवाईवर ठाम आहेत. त्यामुळे मंत्री विखे आणि आमदार पवार यांच्यात तलाठी भरतीवरून अजूनही शीतयुद्ध सुरू आहे.

महसूल पंधरवाड्यात नवनियुक्त तलाठ्यांना नियुक्तीपत्र देताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी तलाठी भरती प्रक्रियेवर आरोप करणाऱ्यांना कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे सुनावले. ही भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकतेने झाल्याचे, राधाकृष्ण विखेंनी सांगितले. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार रोहित पवार यांच्याकडे हा रोख होता. यावर आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या 'एक्स' खात्यावर पोस्ट शेअर करत मंत्री राधाकृष्ण विखे यांना डिवचत प्रत्युत्तर दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या पोस्टमध्ये मंत्री विखे यांना भरती प्रक्रियेसंदर्भात आपणास एक गोपनीय 'पीडीएफ' फाईल 'डीएम' (डायरेक्ट मेसेज) केल्याची आठवण करून दिली. आपल्यास अधिकाऱ्यांनी हा गोपनीय अहवाल सरकारला पाठवला होता, ज्यावर आपल्या सरकारने काहीही कार्यवाही केली नाही. मला हा अहवाल कसा मिळाला हे विचारू नका, कारण सरकारी यंत्रणेतही अनेक अधिकारी पारदर्शक यंत्रणेसाठी प्रयत्शील असतात. असो! असे म्हणत अधिकाऱ्यांच्या गोपनीय अहवालाची माहिती करून देत, बरंच काही आपल्याकडे आहे, याची आठवण आमदार पवार यांनी मंत्री विखे यांना करून दिली.

आमदार पवार यांनी मंत्री विखे यांना या फाईलवर हिंमत दाखवावी, असं आव्हान दिले आहे. ही फाईल पब्लिक करून त्यावर स्पष्टीकरण द्यावं आणि खरा महाभाग कोण हे महाराष्ट्राला सांगावं, असे आव्हान आमदार पवार यांनी मंत्री विखे यांना दिले आहे. आमदार पवार यांनी मंत्री विखे यांना दिलेले हे आव्हान म्हणजे, ते तलाठी भरती प्रकियेतील गैरप्रकाराच्या आरोपांवर ठाम असल्याचे संकेत दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT