Ram Shinde Vs Namdev Raut : आमदार शिंदे चिंचोक्याचाच कारखाना काढू शकतात; जुन्या सहकाऱ्यानं हाणला टोला

Namdev Raut criticism of Ram Shinde : भाजपचे माजी मंत्री आमदार राम शिंदे यांचे जुने सहकारी मित्र माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी एमआयडीसी प्रकरणावरून टीका केली आहे. राऊत यांनी राम शिंदे यांच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्हं उपस्थित केल्याने राजकीय संघर्ष अधिक चिघळणार असे दिसते.
Ram Shinde Vs Namdev Raut
Ram Shinde Vs Namdev RautSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : भाजपचे आमदार राम शिंदे यांचे जुने सहकारी आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाबरोबर असलेले नामदेव राऊत यांनी राम शिंदेंच्या क्षमतेवर जहरी टीका केली. नामदेव राऊत माजी नगराध्यक्ष असून, त्यांनी कर्जत-जामखेड एमआयडीसी प्रकरणावर राम शिंदेंना चांगलेच लक्ष्य केले.

'चिंचोक्याचा कारखाना काढण्याची पात्रता असणाऱ्यांनी आमदार रोहित पवारांच्या एमआयडीसीबाबत बोलू नये', असा अप्रत्यक्ष टोला नामदेव राऊत यांनी लगावला.

माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी मिरजगावमधील कार्यक्रमात भाजपचे (BJP) माजी मंत्री आमदार राम शिंदे यांच्या क्षमतेवर जोरदार टोलेबाजी केली. खासदार नीलेश लंके, खासदार धैर्यशील मोहिते आणि आमदार रोहित पवार उपस्थित होते. नामदेव राऊत यांनी भाषणात आमदार शिंदेंची क्षमता काढत त्यांना लक्ष्य केल्याने विधानसभा निवडणुकीची ही नांदी असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

Ram Shinde Vs Namdev Raut
Vikhe Patil Vs Thorat : विखे-थोरात यांनी एकमेकांच्या घराण्याचे छंदच काढले

नामदेव राऊत यांनी कर्जत-जामखेडच्या तरुणांच्या आणि महिलांच्या हाताला काम आवश्यक आहे. यासाठी एमआयडीसी फक्त एकच माणूस आणू शकतो ते म्हणजे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)! त्यांच्याकडे मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन आहे. यापूर्वी आम्ही 10 वर्षे कोणाच्या तरी हाताखाली राजकीय काम केले आहे. त्यांची क्षमता काय आहे? हे नामदेव राऊत जाणतो. चिंचोके फोडणार चिंचोक्यांचाच कारखाना आणू शकते, असे म्हणत राम शिंदेच्या कोंभळी-थेरगाव आणि रवळगावच्या एमआयडीसीवर संधान साधले.

Ram Shinde Vs Namdev Raut
Nilesh Lanke On Ram Shinde : 'पवारांचा नाद करू नका, नाहीतर तुमचं राजकीय...' ; खासदार लंकेंचा भाजपच्या शिंदेंना 'मित्रत्वा'चा सल्ला

एमआयडीसी कर्जत तालुक्यात असली, तरी ती 35 ते 40 किलोमीटर अहमदनगर लगत देखील आहे. त्याचा फायदा कर्जतला न होता. नगरला जास्त होऊ शकतो. तुलनेत आमदार रोहित पवारांनी पाटेगाव भागात एमआयडीसी उभारण्याचा निर्णय दोन्ही तालुक्यास फायदेशीर आहे, असे नामदेव राऊत यांनी म्हटले.

अदानींच्या सारथ्यची पाठराखण

आमदार रोहित पवार यांनी उद्योजक अदानी यांच्या गाडीचे सारथ्य केले होते. त्यावर ड्रायव्हर म्हणून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्याचा समाचार देखील नामदेव राऊत यांनी घेतला. कर्जत-जामखेडच्या विकासासाठी आमदार पवार अदानीचीच काय कोणाची पण गाडी चालवतील. कारण त्यांना कर्जत-जामखेडचा सर्वांगीण विकास करायचा आहे. आणि यासाठी ते कायम तत्पर असतात, असे म्हणत कार्यक्रमातील सर्वांचे लक्ष आपल्या भाषणाकडे वेधले.

शिंदे-राऊत यांची राजकीय मैत्री

आमदार राम शिंदेच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात नामदेव राऊत मतदारसंघात आपल्या राजकीय कार्याने वेगळी मोहोर उमटवली. ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले. राम शिंदेंनी राऊत यांच्या सहकार्याने एकहाती सत्ता मिळवत राऊत प्रथम नगराध्यक्ष, तर अडीच वर्षांनी उपनगराध्यक्ष पद देखील दिले. राम शिंदे यांनी मंत्रिपदाच्या काळात जवळपास 150 कोटींचा निधी त्यांच्या हातात सोपवला. त्यांना मतदारसंघात राम-लक्ष्मणाची जोडी म्हणून देखील संबोधले जात होते. मात्र शिंदेंच्या पराभवानंतर त्यांनी आमदार आमदार रोहित पवारांची साथ धरली आणि राऊत यांनी त्यांच्या स्नुषा नगराध्यक्ष पदी विराजमान केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com