Ashok Chavan News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Chavhan Resignation: नाशिकच्या 'त्या' महाराजांचा सल्ला अशोकरावांनी मानला अन् ..!

Sampat Devgire

Ashok Chavan Latest Updates In Marathi : महाराष्ट्रातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. शिवाय ते लवकरच भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. या सर्व राजकीय घडामोडींमध्ये नाशिकचे देखील एक कनेक्शन पुढे आले आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण(Ashok Chavhan) काँग्रेस पक्ष सोडणार आणि भाजपात प्रवेश करणार अशा बातम्या यापूर्वी देखील सार्वत्रिक झाल्या होत्या. मात्र तेव्हा या सर्व बातम्या निराधार असल्याचे चव्हाण यांनी दर्शवले होते. परंतु आता याच्या खोलात गेल्यास वेगळीच माहिती पुढे आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, चव्हाण गेले दोन वर्ष भाजपा आणि त्यांच्या आक्रमक नीतीपुढे हतबल झाले होते. आदर्श प्रकरणाचा ससेमीरा अद्याप संपलेला नव्हता. काँग्रेस पक्षात आगामी रणनीती आणि राजकारणात चव्हाण साईडट्रॅकला गेलेले नेतृत्व होतं. त्यांच्या जवळचे आणि चव्हाण सत्तेच्या पदावर असताना लाभार्थी ठरलेले बहुतांश नेते त्यांच्यापासून दूर झाले होते. चव्हाण यांचे कार्यक्षेत्र मराठवाडा असले तरी प्रामुख्याने नांदेड जिल्हा एवढेच मर्यादित होते. अशा स्थितीत राजकीयदृष्ट्या ते अस्वस्थ झाले होते.

प्राप्त माहितीनुसार, या पार्श्वभूमीवर त्यांनी नाशिक येथील एका आध्यात्मिक गुरुशी संपर्क साधून पुढील रणनीती विषयी मार्गदर्शन घेतले होते. एवढच नाही तर नाशिक येथे त्यांनी विविध विधी देखील केले होते. तसेच दुसऱ्या टप्प्यात त्यांनी आपल्या निवासस्थानी संबंधितांच्या सूचनेनुसार धार्मिक विधी करून घेतले होते.

चव्हाण यांना त्यांचे राजकीय भवितव्य काय असेल? त्यासाठी कोणता मार्ग स्वीकारावा किंवा कशी वाटचाल करावी याबाबत नाशिकच्या आध्यात्मिक गुरुंकडून स्पष्ट मार्गदर्शन करण्यात आले होते. चव्हाण यांना दोन कन्या आहेत. यातील कोणती कन्या राजकारणात स्थिरस्थावर होऊ शकते. तिच्या राजकीय भवितव्यासाठी काय वाटचाल स्वीकारावी लागेल. यातून चव्हाण यांनी आज पक्षाचा राजीनामा दिला आहे, असा दावा करण्यात येतो.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या एकूण राजकीय घडामोडी आणि वाटचाली संदर्भात राजकीय 'परिवर्तन वाद' हा प्रमुख सल्ला देण्यात आलेला होता. त्यानुसारच चव्हाण यांनी राजीनामा दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. आगामी राजकारणात अशोक चव्हाण यांच्यापेक्षा त्यांची कन्या सक्रिय असेल. त्यादृष्टीने सर्व व्यूहरचना करण्यात आल्याचे बोलले जाते. एकंदरच नाशिकच्या 'त्या' अध्यात्मिक गुरुचा सल्ला अशोक चव्हाण यांनी मानला आणि आज आपला राजीनामा दिला, असा दावा विश्वसनीय सूत्रांनी केला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT