Ashok Kharat Bail Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Kharat Bail : अशोक खरातला आज जामीन मिळणार? उज्ज्वल निकमांचा विरोध; SIT तपासामुळे उत्सुकता

Ashok Kharat's bail plea comes up for hearing in Nashik court today, with Ujjwal Nikam opposing bail : महिला लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या प्रकरणांतील आरोपी अशोक खरातच्या जामीन अर्जावर नाशिक न्यायालयात आज सुनावणी; सरकारी पक्षाचा जामिनाला विरोध.

Sampat Devgire

Ashok Kharat Court Hearing : भोंदू कॅप्टन अशोक खरात याच्या महिला लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांनी पुन्हा उचल खाल्ली आहे.

परराज्यातील महिलांची फसवणूक व अन्यप्रकरणे चर्चेत आहेत. शिर्डी येथील काही हॉटेल्स मध्ये या घटना घडल्याची चर्चा सुरू आहे.

कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) यांच्या बनावट पतसंस्था खाते व त्यातील कोट्यावधी रुपयांच्या हवाला रॅकेटचा तपास नेमका कोणत्या वळणावर पोहोचला. याबाबत अद्यापही एसआयटी कडून माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे खरातला कोणाचे संरक्षण आहे याची चर्चा जोरात आहे.

त्यातच कॅप्टन खरात यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. सध्या एसटी चा तपास पूर्ण झाल्याने जामीन मिळावा अशी मागणी त्याने नाशिकच्या (Nashik) न्यायालयात केली आहे. या संदर्भात सरकारी वकिलांकडून यापूर्वीच जामीनाला विरोध झाला आहे.

बहुचर्चित ॲड. उज्वल निकम यांनी या प्रकरणात शासनातर्फे काम पाहिले आहे. कॅप्टन खरातला जामीन देऊ नये अशी भूमिका त्यांनी न्यायालयापुढे मांडली आहे. त्यामुळे या खटल्याच्या आज होणाऱ्या सुनावणीत काय निर्णय होतो याची उत्सुकता आहे.

एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली आठ गुन्ह्यांचा तपास यापूर्वीच झालेला आहे. त्याचे दोषारोप पत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे. अन्य सहा गुण्यांचा तपास पोलिसांनी अन्य यंत्रणांनी केला आहे. प्रकरणात ईडीनेही चौकशी केली होती. ईडीने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याबाबत काय भूमिका घेतली हे स्पष्ट झालेले नाही.

या पार्श्वभूमीवर कॅप्टन खरात याचे परराज्यातील महिलांची ही लैंगिक शोषणाचे काही प्रकार चर्चेत आले आहे. सोशल मीडियावर त्याची जोरात चर्चा आहे. शिर्डी येथे हॉटेल्समध्ये हे प्रकार घडल्याचे बोलले जाते. त्याबाबत पोलिसांनी कोणताही तपास केलेला नाही. त्यामुळे खरात याच्या कारागृहातील मुक्कामाचे काय होणार याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT