Nashik News : स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी शासनाने आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT)स्थापन केली आहे. दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी आज तेजस्वी सातपुते यांची भेट घेतली. अंनिस कार्यकर्त्यांनी काही गोपनीय माहिती त्यांना दिली.
भोंदूबाबा स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातवर कठोर करवाई करण्याची मागणी अंनिसने केली आहे. तेजस्वी सातपुते यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिल्यानंतर अंनिस राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की, हा अशोक खरात लोकांची दिशाभूल करायचा. कोल्ह्याची शिंगे आणून अघोरी पूजा करत होता. मुळात कोल्ह्याला शिंगेच नसतात परंतु तो लोकांची दिशाभूल करायचा व कोल्ह्याची शिंगे असल्याचे सांगत असा दावा अंनिसचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे यांनी केला आहे.
भोंदू बाबा खरात हा वन्यजीव प्राण्यांच्या शरीराचे अवशेष जादूटोणा करण्यासाठी करत असल्याचे समजते. त्याची चौकशी होऊन वन्यजीव संरक्षण कायद्याचे कलम लावावे व त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी अंनिसने केली आहे. त्याचबरोबर भोंदू बाबा खरात हा काही उच्चभ्रू लोकांना कस्तुरी देत होता. ते जर खरे असेल तर वन्यजीव कायद्याअंतर्गत त्याची चौकशी करावी अशी मागणी आम्ही केल्याचे कृष्णा चांदगुडे यांनी सांगितले. (Nashik News)
आमच्याकडील काही गोपनिय माहिती आम्ही तेजस्वी सातपुते यांना दिली आहे. काही व्यक्ती जे तपासात मदत करु शकतात अशा लोकांचे संपर्क क्रंमाक आम्ही आयपीएस सातपुते मॅडमकडे दिल्याचे कृष्णा चांदगुडे यांनी सांगितले.
२०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या भोंदू बाबाच्या भेटीसाठी आले होते. त्यावेळी आम्ही त्याविरोधात आवाज उठवत निषेध नोंदवला होता. परंतु तेव्हा आमच्यावर दबाव आणला गेला. मंत्र्यांचे ओएसडी आम्हाला फोन करत होते. त्यातून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. हे प्रकरण जुने झाले, त्यामुळे त्याला फाटा द्यायचा नाही असे सांगितले गेले, अशोक खरातच्या माणसाकडूनही धमक्या आल्या. आमच्या लोकांवर पिस्तुल रोखले होते असा खळबळजनक आरोप अंनिसने केला आहे. त्यामुळे आता यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अंनिसने केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.