Ashok Kharat Case  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Kharat Case : एक दोन नव्हे तब्बल 160 जीबींचा डेटा; खरातच्या विकृतीचा सर्वात मोठा पुरावा आला समोर, 19 फोल्डर, 3 पेन ड्राईव्ह अन् A, B, C कोडवर्ड

Ashok Kharat Case Digital Evidence : एकीकडे लोकांना ज्योतिषाच्या नावाखाली फसवलं, तर दुसरीकडे थेट दुबईपर्यंत हवाला रॅकेट चालवलं आणि त्यानंतर थेट नाशिकमधील शेतकऱ्यांची फसवणूक असे एक ना अनेक गुन्हे खरातने केल्याचं उघडकीस येत आहे. अशातच खरातला तिसऱ्या गु्न्ह्यात पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Jagdish Patil

Nashik News, 10 Apr : भोंदू अशोक खरातच्या विरोधात दिवसेंदिवस तक्रार देणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. काल गुरूवारी खरातला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर तिसऱ्या गुन्ह्यात खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली आहे.

अशातच आता खरात प्रकरणात गुरूवारी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे तपास यंत्रणांनी खरातशी संबंधित डिजिटल पुरावे गोळा करण्याचं काम केलं आहे. या पुराव्यात तब्बल 160 GB डिजिटल पुरावे तपास यंत्रणांना मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2024 कालावधीतील हे सर्व पुरावे कॅनडा कॉर्नर कार्यालयातून जप्त करण्यात आले आहेत. या पुराव्याचा तपास केला असता तपास पथकांच्या निदर्शनात एक धक्कादायक बाब आली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रत्येक पुराव्यावर A, B, C नावाचे कोडवर्ड दिले असून, A कोडवर्ड असलेल्या फोल्डरमध्ये लैंगिक अत्याचाराशी संबंधित पुरावे असल्याचं समोर आलं आहे.

या डिजिटल पुराव्यातून खरातच्या अनेक कारनाम्यांचा भांडाफोड होणार असून या संबंधिक फॉरेन्सिक अहवाल एसआयटीकडे सादर करण्यात आला आहे. या पुराव्यांमुळे आता खरात विरोधातील पुरावे अधिक मजबूत होणार आहेत. सध्या तपासात 32GB क्षमतेचे आणि 19 फोल्डर डेटा असणारे 3 पेन ड्राईव्ह, 64GB क्षमतेचे OTG पेन ड्राइव्ह आणि लॅपटॉपमधील डेटा एसआयटीने स्कॅन केला आहे.

तर या पुराव्याशी संबंधित साक्षीदार आणि पीडितांचे जबाबहीही एसआयटीने नोंदवले आहेत. जे न्यायालयात सादर करण्यात येणार आहेत. या सर्व घडामोडी आणि पुराव्यांमुळे भोंदू अशोक खरातचा पाय किती खोलात आहे, याचा अंदाज येत आहे.

एकीकडे लोकांना ज्योतिषाच्या नावाखाली फसवलं, तर दुसरीकडे थेट दुबईपर्यंत हवाला रॅकेट चालवलं आणि त्यानंतर थेट नाशिकमधील शेतकऱ्यांची फसवणूक असे एक ना अनेक गुन्हे खरातने केल्याचं उघडकीस येत आहे. अशातच खरातला तिसऱ्या गु्न्ह्यात पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता या पोलीस कोठडीत तो आणखी कोणत्या गुन्ह्याची कबुली पोलिसांसमोर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT