Ashok Kharat  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Kharat : दोन-तीन बड्या नेत्यांच्या फोटोवर फुली ; आता थेट दिल्लीतून अशोक खरातच्या विरोधात तगडी केस उभी करण्याच्या हालचाली..

Ashok Kharat Case : अशोक खरातला महिलांचे लैगिंक शोषण व कोट्यावधींच्या फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेली असून एसआयटी व ईडी अशा दोन्ही तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

Ganesh Sonawane

Maharashtra Politics : नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याचे अनेक कारनामे आतापर्यंत तपासात समोर आले आहेत. त्याने स्वतःला 'दैवी अवतार' सांगून अनेक महिलांचे लैंगिक शोषण तर केलच शिवाय अनेक हायप्रोफाईल लोकांची आर्थिक लूट केली. गैरव्यवहारातून त्याने कोट्यावधींची माया जमवल्याने त्यासंदर्भातही ईडीकडून तपास सुरु आहे.

दुसरीकडे, खरातने राजकीय क्षेत्रातही आपले जाळे विणले होते. अनेक नेत्यांचे त्याच्यासोबतचे फोटोही समोर आलेले आहेत. दरम्यान, आता तपासादरम्यान तपास यंत्रणांच्या हाती अत्यंत धक्कादायक पुरावे लागल्याचे सांगितले जात आहे. अशोक खरातने दोन-तीन बड्या राजकीय नेत्यांच्या फोटोंवर फुली (X) मारल्याचं तपासात उघड झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, दिवंगत नेते अजित पवार यांच्या फोटोवर कोणतीही फुली नसल्याचं समोर आल्याचही सांगितलं जात असून असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने केंद्रीय गृहमंत्रालयातील सूत्रांच्या आधारे दिले आहे.

खरातच्या या विचित्र कृत्यामागचा नेमका उद्देश काय होता? याचा तपास आता SIT करत आहे. मात्र राजकीय नेत्यांच्या फोटोंवर फुली मारल्याने अशोक खरातचा मुक्काम आयुष्यभर कारागृहात राहील, अशी तगडी केस उभी करण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरु आहेत, अशी केंद्रीय गृहमंत्रालयातील उच्चस्तरीय सूत्रांची माहिती आहे.

दरम्यान एसआयटीच्या पथकाकडून अशोक खरातची कसून चौकशी सुरु असून तो आता मानसिकरित्या पूर्णपणे खचला आहे. मी इथून बाहेर पडेन असं वाटत नाही, माझं मरण इथेच आहे, अशी भविष्यवाणी तो करु लागल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. नाशिकसह शिर्डी व राहाता येथे खरातवर आतापर्यंत १३ गुन्हे दाखल आहे.

तसेच एसआयटीने खरातच्या आर्थिक व्यवहारांचे दस्तऐवज हे ईडीकडे सुपुर्त केले आहेत. त्यानुसार त्याने गैर मार्गाने मिळवलेल्या संपत्तीचा तपास करत आहे. ईडीने त्याच्यासह त्याची फरार पत्नी कल्पना खरात यांची बॅंक खाती सील केली आहे. खरातच्या मुलाच्या बॅंक खात्यांची देखील ईडीकडून चौकशी केली जात आहे. खरातच्या गैरमार्गाने कमावलेल्या संपत्तीवर टाच आणण्याचे काम वेगाने सुरु आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT