

Ashok Kharat Land Scam : भोंदू अशोक खरातने ज्योतिष आणि धार्मिक विधीच्या नावाखाली आपल्या भक्तांना फसवलं, शेकडो महिलांचं लैंगिक शोषण देखील केलंच पण त्याने यावरच न थांबता आपली माया वाढवण्याचा सपाटा देखील लावला होता. हे आता तपासातून समोर येत आहे.
अशोक खरातला पोलिसांनी ताब्यात घेतल्यापासून दररोज नवनवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. खरातने पुणे, शिर्डी, नाशिकसह इतर शहरांमध्ये कोट्यावधींची मालमत्ता खरेदी केल्याची माहिती तर समोर आली आहेच.
मात्र, आता खरातचे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तिपीठ महामार्गाशी असलेलं कनेक्शन देखील समोर आलं आहे. या प्रकरणामुळे त्याचे कॉन्टॅक्ट किती मजबूत होते याचा अंदाज येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार खरातने उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावात कोट्यवधींची जमीन खरेदी केली आहे.
आश्चर्याची बाबा म्हणजे त्याने जिथे जमीन खरेदी केली आहे. त्याच गावातून बहुचर्चित असा शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. कळमण गावातील गट क्रमांक 200/1 मधील 4.48 हेक्टर म्हणजे सुमारे 11 एकरांपेक्षा जास्तीची जमीन खरातच्या नावावर खरेदी करण्यात आली आहे.
तर मार्च 2024 रोजी झालेल्या व्यवहारानुसार या जमीनीची किंमत 2 कोटी 40 लाख 91 हजार 200 रुपये इतकी असल्याची नोंद खरेदीखतात आहे. त्यामुळे आता खरातने नेमकं शक्तिपीठ महामार्गावरच जमीन कशी मिळवली?
खरातला शक्तिपीठ महामार्ग नेमका कुठून जाणार आहे आणि कुठे पैसा गुंतवल्यास परतावा जास्त मिळेल याची माहिती नेमकी कोणी दिली? यामध्ये कोणत्या शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.