bhondubaba case; Ashok Kharat sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Kharat : तू खूप सुंदर आहेस… पण तुझा पती तुला.. अशोक खरात महिलांना कसं ओढायचा जाळ्यात? चौकशीत धक्कादायक माहिती उघड

Ashok Kharat case : वासनांध भोंदूबाबा अशोक खरातने अनेक महिलांचे लैगिंक शोषण केले. महिलांवर तो कशाप्रकारे प्रभाव टाकत व त्यांना आपल्या जाळ्यात ओढत त्यासंदर्भात तपासातून माहिती समोर आली आहे.

Ganesh Sonawane

Nashik News : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात हा महिलांवरील अत्याचार प्रकरणात पोलिस कोठडीत असून खरातला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याच्यावर दाखल गुन्ह्यांमध्ये आता वाढ झाली आहे. शेकडो महिलांचे लैगिंक शोषण व आर्थिक फसवणूक प्रकरणात त्याच्यावर आतापर्यंत दहा गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे त्याच्या कोठडीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, खऱातची एसआयटीने कसून चौकशी केली आहे. खरातच्या काळ्या कारनाम्यांबाबत दिवसेंदिवस नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून तो महिलांना कशाप्रकारे आपल्या जाळ्यात ओढायचा तेही चौकशीत उघड झाले आहे. तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी अनेक फंडे वापरत. त्यात पोलिसांनी केलेल्या चौकशीत असे उघड झाले आहे की, खरात महिलांशी गोड बोलून, त्यांची स्तुती करून आणि भावनिक पातळीवर जवळीक साधून त्यांना आपल्या जाळ्यात ओढत होता. त्यासाठी तो कथित माइंड रिडींग स्ट्रॅटेजी वापरत असे.

महिला कौटुंबिक समस्या घेऊन खरातकडे जात. तो अगदी बरोबर त्यांची दुखती नस ओळखून फायदा घेत असल्याचे समोर आले आहे. 'तू खूप सुंदर आहेस, 'तुझा पती तुला समजून घेत नाही', त्याला तुझी कदर नाही, 'तुझी खरी क्षमता कोणालाच कळत नाही' अशा प्रकारे शब्दांचे जाळे टाकत तो महिलांना प्रभावित करत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर तो महिलांना विविध गोष्टी आणि उपाय सांगून आपल्या जाळ्यात ओढत. भोंदू खरातच्या या गोड बोलण्यात महिला फसत अशी माहिती सूत्रांनी दिली. चौकशीत त्याने भावनिक जाळं विणून महिलांचा विश्वास संपादन केल्याची कबुली दिल्याचीही माहिती समोर येत आहे.

दरम्यान, आतापर्यंत खरातविरोधात दाखल झालेल्या 10 गुन्ह्यांमध्ये 8 गुन्हे हे महिलांवरील अत्याचारासंदर्भात तर 2 गुन्हे आर्थिक फसवणुकीशी संबंधित आहेत. त्याने आतापर्यंत किती महिलांचे शोषण केले आहे याचा आकडा अद्याप कळू शकलेला नाही. कारण त्यासंदर्भात विचारले असता खरातने उत्तर देणे टाळल्याचे समजते. नेमका आकडा सांगता येणार नाही असा दावा खरातने केल्याचे सूत्रांकडून कळते.

दरम्यान आज खरातची कोठडी संपणार असल्याने त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. परंतु खरातवर आणखी नवे दोन गुन्हे दाखल झाल्याने या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी एसआयटीकडून त्याची कोठडीची मुदत वाढवून मागितली जावू शकते. न्यायालयाने त्याला मंगळवारी दि. २४ पाच दिवसांची कोठडी सुनावली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT