Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची चौकशी होणार का? पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Rupali Chakankar Will face investigation in the Ashok Kharat case? अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांची चौकशी होणार का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Rupali Chakankar Will face investigation in the Ashok Kharat case?
Rupali Chakankar Will face investigation in the Ashok Kharat caseSarkarnama
Published on
Updated on

Rupali Chakankar News Update: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे, त्यानंतर त्यांनी आता राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे. खरात प्रकरणी चाकणकरांनी सर्व पदाचा राजीनामा द्यावा, ही मागणी विरोधकांनी सुरवातीपासून लावून धरली होती.

चाकणकरांनी दोन्ही महत्वाच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतरही विरोधक शांत बसलेले नाहीत, चाकणकरांना या प्रकरणात सहआरोपी करा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. याबाबत नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मोठी माहिती दिली. संदीप कर्णिक एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना कर्णिक यांनी ही माहिती दिली आहे.

संदीप कर्णिक म्हणाले, "अशोक खरात प्रकरणात तपास सुरू असून पुढे काही गोष्टी समोर आल्या तर योग्य ती कारवाई केली जाणार," असे संदीप कर्णिक यांनी चाकणकरांच्या राजीनाम्याबाबत बोलताना सांगितले,

Rupali Chakankar Will face investigation in the Ashok Kharat case?
Rishikesh Vaidya Arrested: खरातनंतर आणखी एका भोंदूबाबाला अटक, पुणे पोलिसांची मोठी कारवाई

रुपाली चाकणकरांची चौकशी होणार का? याबात कर्णिक म्हणाले, "आमच्याकडे सुरुवातीला जी तक्रार आली होती, त्यानुसार या प्रकरणात कुठल्याही राजकीय व्यक्तीचा सहभाग नव्हता किंवा दबाव नव्हता. पण आम्ही आरोपीला अटक केल्यानंतर काही गोष्टी बाहेर आल्या. शिर्डीमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला गेला होता किंवा इतर ठिकाणी काही झालं होतं हे नंतर समोर आलं."

Rupali Chakankar Will face investigation in the Ashok Kharat case?
Ashok Kharat News: खरातनं अनेकांना कसं गंडवलं? कशी होती त्याची मोडस ऑपरेंडी? फेस, हॉट, कोल्ड' रीडिंगचा वापर

रुपाली चाकणकरांनी सोशल मीडियावर याबाबत स्पष्टीकरण दिले आहे."खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे.त्याच्या आर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही, आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे.तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे,असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत,ते वेदनादायक आहे.सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच. हा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा,ही माझी मागणी मी यापूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे," असे चाकणकरांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com