Maharashtra Politics : नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्या अटकेनंतर आता राजकीय वातावरण देखील तापलं आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली चाकणकरांसह अनेक राजकीय नेत्यांसोबतचे त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे विरोधकांकडून चाकणकरांवर अनेक आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत.
शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील याप्रकरणावरुन चाकणकरांवर अंत्यत गंभीर आरोप केले आहेत. तसेच चाकणकर यांच्या अटकेची आणि राजीनाम्याची मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. रुपाली चाकणकरांना अटक करुन त्यांची नार्को चाचणी करा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.
रुपाली चाकणकर या तंत्र-मंत्र विद्या करायच्या. सोमवती अमावस्येला 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्येच्या दिवशी चाकणकरांनी स्वत:ची अनामिका कापली होती, असं मला एका पीडितेने सांगितलं, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. सुषमा अंधारे म्हणाल्या, अनामिका हे हाताच्या करंगळी आणि मधल्या बोटाच्या मधले बोट आहे.
तसेच तंत्रमंत्र विद्येत अनामिका का कापतात?, याबाबतही सुषमा अंधारेंनी सांगितलं की, तंत्र-मंत्र विद्येत हाताची अनामिका (Ring Finger) अत्यंत महत्त्वाची मानली जाते. हे बोट यश आणि आकर्षण याच्याशी जोडलेले आहे. या बोटाचा वापर मुख्यत्वे एखाद्या व्यक्तीला प्रभावित करण्यासाठी केला जातो.
या बोटाद्वारे ऊर्जा शरीरात प्रवाहित किंवा शोषली जाऊ शकते. अनामिका ही सूर्य (यश) आणि शुक्र (आकर्षण) यांच्याशी जोडलेली आहे, ज्यामुळे ती मंत्रोच्चाराद्वारे ऊर्जा प्रवाहित करण्याचे साधन बनते. हे आरोप करत असतानाच सुषमा अंधारेंनी रुपाली चाकणकर यांचे काही फोटोही दाखवले ज्यामध्ये त्यांच्या हाताला बँडेज असल्याचे त्यांनी दाखवले.
त्यामुळे चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, हे सगळ करण्याअगोदर त्यांना त्या पदावरून काढलं पाहिजे, अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली. रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे घरगुती संबंध आहेत. खरातच्या मुलीच्या लग्नाला चाकणकर होत्या. चाकणकरांचा घरात खरात यांची भाची राहते, असा दावाही सुषमा अंधारे यांनी केला. खरात व चाकणकर यांचे आर्थिक हितसंबंध असल्याची कागदपत्रे मी दोन दिवसांत सर्वांसमोर आणणार असा इशाराही अंधारे यांनी दिला.
नेमकं प्रकरण काय?
अशोक खरात याच्याविरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक खरात याने एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली असून त्याला अटक करण्यात आली आहे. तपासात त्याच्याकडे ५८ व्हिडिओ सापडले आहेत, म्हणजे किमान ५८ महिलांवर अत्याचार झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अशोक खरात यांची पाद्यपूजा केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.