Minister Radhakrishna Vikhe Patil  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Kharat Fake Baba : अशोक खरातचे 'मोक्कार' कारनामे! नाशिक क्राइम ब्रांच झोपली होती का? परदेशी पळून जाण्याचा कट मुख्यमंत्र्यांनी उधळला; मंत्री विखेंचा दावा

Minister Radhakrishna Vikhe Patil raises serious concerns over Nashik Crime Branch functioning amid allegations of exploitation by self-styled godman Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात याच्या महिलांच्या शोषणावर अहिल्यानगर भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिक पोलिस दलाच्या कारभारावर प्रतिक्रिया दिली आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar Radhakrishna Vikhe Patil : बलात्काराच्या गुन्ह्यानंतर नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या राजकीय संबंधाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांना खरात याच्याशी असलेल्या अध्यात्मिक संबंधामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून राजीनामा दिला आहे.

अहिल्यानगरचे भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खरात प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, शिर्डी पोलिसांचे कौतुक करताना, नाशिक क्राइम ब्रांचच्या नाकाखाली हा प्रकार सुरू असताना, तिथला यंत्रणा काय करत होती? असा प्रश्न केला आहे. मंत्री विखे पाटील यांच्या या प्रतिक्रियेमुळे नाशिक क्राइम ब्रांचच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मंत्री विखे पाटील म्हणाले, अशोक खरातच्या संस्थेला थेट दारणा धरणातून पाणी देण्यात आले. यावरून तो किती उच्च अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता, हे लक्षात येते. खूप लागेबांधे होते. हा सर्व घृणास्पद प्रकार समोर आला आहे. शिर्डी (Shirdi) पोलिसांमुळे पहिल्यांदा गुन्ह्याची नोंद झाली. त्यानंतर प्रकार समोर आला आहे.

पुढे चक्रे फिरली. पोलिस महासंचालकांनी लक्ष घातले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाॅकआऊट नोटीस काढली. नाहीतर आरोप परदेशी पळून जाण्याच्या तयारी होता. शिर्डी पोलिसांमुळे हा प्रकार समोर आल्या नाहीतर हा आरोपी मोकाट असता, अशी भीती देखील मंत्री विखे पाटलांनी (Radhakrishna Vikhe Patil) व्यक्त केली.

एवढ्या मोठ्याप्रमाणात कांड होत असताना, नाशिकची एलसीबी, क्राइम ब्रांच काय करत होती? हा प्रश्न इथं पडतो. तिथल्या यंत्रणेविषयी आश्चर्य वाटतं. शिर्डी पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर तुम्ही कारवाई करता! पुरावे घेता! पोलिसांच्या कर्तृत्वावर शंका नाही. परंतु नाशिकच्या एलसीबी, क्राइम ब्रांचच्या नाकाखाली, हा प्रकार घडला. मग तिथली यंत्रणा काय करत होती, असा सवाल पडतोच, असेही मंत्री विखे पाटील यांनी म्हटलं.

पाणी देण्याच्या प्रस्तावाच्या चौकशीचा आदेश

'दारणा धरणातून, अशोक खरात याच्या संस्थेला देण्यात येणारे पाणीचे आरक्षण रद्द करण्यात आली. निश्चितपणे पाणी देण्याचा अध्यादेश कोणी काढला, कोणी शिफारस केली होती, याची संपूर्ण चौकशी होईल,' असेही संकेत मंत्री विखे पाटील यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT