Ashok Kharat Case : नाशिकमधील भोंदू अशोक खरातच्या कारनाम्यांची संख्या आणि चर्चा दोन्ही काही कमी होताना दिसत नाही. अंकशास्रामध्ये निष्णात असल्याचा दावा करणाऱ्या भोंदू खरातने आतापर्यंत महिलांचे लैगिंक शोषण केल्याचे व अनेक हायप्रोफाईल लोकांना आर्थिक गंडा घातल्याचे समोर आले आहे. याशिवाय त्याने गैरमार्गाने मोठी माया जमवली आहे. आता तपासातून त्याच्या बाबत आणखी एक माहिती समोर आली आहे.
भोंदू अशोक खरात आपल्या स्वतःसाठी ९ अंक हा शुभांक असल्याचं मानत होता. म्हणूनच त्याच्या दोन्ही कारसाठी त्याने RTO मधून ९ अंक होणारे 'चॉइस' नंबर घेतल्याचे तपासातून उघड झाले आहे. मात्र खरातचा हा अंकाचा खेळ आता त्याच्यावरच उलटला आहे. कारण यातून त्याने कसा अंधश्रेद्धाचा बाजार मांडला होता ते स्पष्ट झालं आहे.
खरातने एका व्यावसायिकाला भीती घालून त्याची महागडी मर्सिडिज बेन्झ ही कार बळजबरी गीप्ट म्हणून घेतली होती. त्या कारचा क्रमांक (एम.एच १५ जी.एल ८१८१) असा निवडला. ८+१+८+ १=१८ अशी बेरीज येते. १८ या अंकाचे जेव्हा एक अंकी रूपांतर केले जाते 1+8 तेव्हा ९ हा अंक तयार होतो. त्याचप्रमाणे त्याच्या बंगल्यात उभ्या असलेल्या दुसऱ्या एका काळ्या रंगाच्या मोटारीचा क्रमांक (२६ बीएच ६४५३ई) असा घेतलेला आहे. या क्रमांकाचेही वरीलप्रमाणे बेरीज आणि एक अंकी रूपांतर केल्यास '९' असा अंक येतो. स्वत:च्या कारचा नंबर तो अशापद्धतीने निवडत असे. (Nashik Crime )
...म्हणून '९' अंकाला पसंती.
अंकशास्त्रात ९ अंकाला मोठे महत्व आहे. अंकशास्त्रानुसार, ९ या अंकाचा अधिपती ग्रह मंगळ असल्याचे सांगितले जाते. ९ अंक हा बंधुत्व, वैश्विक कल्याण, पैसा, भाग्य, प्रवास, खेळ आणि घटनांची पूर्तता यांचे प्रतीक आहे असे अंकशास्त्रानुसार मानले जाते. तसेच हा अंक समृद्धी, औदार्य आणि मानवतावादी कार्यांशी जोडलेला आहे असेही मानले जाते. तसेच पैसा आणि समृद्धी आकर्षित करण्याशी संबंधित असलेला अंक ९ आहे, असेसुद्धा अंकशास्त्रानुसार मानण्यात येते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.