ai image Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Kharat : भोंदू खरातचा 20 फुटी नाग पाहून वळायची बोबडी, काहीजण तर बेशुद्ध होत ; तिथेच सगळे राजकारणी फसले..

Ashok Kharat 20 foot snake trick : नाशिकमधील भोंदू अशोक खरातकडे असलेल्या २० फुटी नागाची कहाणी समोर आली आहे. त्याच्या याच खोट्या नागाला भुलून राजकीय नेते, अधिकारी त्याच्या नादाला लागले.

Ganesh Sonawane

Nashik News : दैवी शक्ती, भविष्यातील घटनांची भीती दर्शवून नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याने शेकडो महिलांचे लैगिंक शोषण केले. हे प्रकरण सध्या राज्यभरात चर्चेत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री स्वत:ला 'कॅप्टन' म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात याच्याकडे भविष्य पाहण्यासाठी जात असे. त्यातील अनेकांचे खरासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले आहेत.

मात्र हे सगळेजण खरातच्या खोट्या आध्यात्मिक रूपाला कसे भुलले, असा प्रश्न महाराष्ट्राच्या नागरिकांना पडलेला असताना त्याच संदर्भातील धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. आपल्याकडे येणारे भाविक, राजकारणी यांची फसवणूक करण्यासाठी व आपला त्यांच्यावर प्रभाव पाडण्यासाठी वेगवेगळे फंडे तो वापरत होता. त्यातीतलच त्याचा 20 फुटी नागाचा फंडा सध्या जोरदार चर्चेत आहे.

सुरुवातीला हायप्रोफाईल भाविकांना त्यांचे भविष्य सांगत त्यांना यशाचा मार्ग दाखविण्याचा दावा अशोक खरात करीत होता. त्यानंतर 2022 मध्ये राज्याच्या तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी सिन्नरच्या त्याच्या मिरगावात जाऊन मंदिरात पूजाविधी केल्यानंतर अशोख खरात याचे नाव संपूर्ण राज्यभरात परिचित झाले. त्यानंतर राज्यातील मंत्री, राजकारणी, सेलिब्रिटी यांची खरातकडे ऊठबस वाढू लागली. हे सगळेजण खरातच्या खोट्या रुपाला भुलले त्यातले एक महत्वाचे कारण म्हणजे त्याच्याकडे असलेला २० फुटांचा नाग होय.

अशोक खरात याने सुमारे 17 वर्षांपूर्वी सिन्नर तालुक्यातील मिरगाव शिवारात श्री ईशानेश्वर मंदिराची उभारणी केली. त्याने स्थापन केलेल्या मंदिरासह त्याचे येथील शिवनिका संस्थान ट्रस्टही आता चर्चेत आले आहे. तिथे रोज सायंकाळच्या सुमारास हा प्रकार चालत असे. अंधार पडला की तो भाविकांना एका ठिकाणी बोलवत असे. दरबारात भक्त मंडळी जमली की अशोक खरात हा ध्यानात मग्न व्हायचा. त्यानंतर तंत्र-मंत्र म्हणून एका 20 फुटी नागाला स्वत:कडे बोलवत असे. तो नाग सरफटत त्याच्यासमोर येऊन फणा काढून डोलत असे. खरात सांगेल त्यापद्धतीने हा नाग हालचाली करत असे. समोर भला मोठा नाग पाहून भक्तांची बोबडी वळत असे. अनेकदा काहीजण तर हे सर्व बघून भीतीने बेशुद्ध होण्याचे प्रसंग ओढावले, असेही सूत्रांनी सांगितले.

त्यानंतर खरात सांगेल तेव्हा हा नाग तेथून निघून जात असे. खरात नागाला अशाप्रकारे वश करत असल्याचे पाहून त्याच्याकडे आपल्या समस्या सोडवण्यासाठी किंवा भविष्य बघण्यासाठी येणाऱ्या अनेक श्रीमंत भक्तांना त्याच्याकडे दैवी शक्ती असल्याचा भास झाला. मात्र प्रत्यक्षात हा संपूर्ण प्रकार भाविकांसोबत केलेली एक फसवणूक होती. कारण हा साप खोटा होता. रिमोट कंट्रोलने नियंत्रित होणारा परदेशातून आणलेला नाग तो वापरत असे. रिमोट कंट्रोल खरातच्या हातात असे. त्या रिमोटच्या साहाय्याने तो सापाला वाटेल तसे फिरवायचा. तो साप हुबेहुब खऱ्या सापासारखा दिसायचा त्यामुळे त्याच्याकडे येणारे हायप्रोफाईल भाविक त्याला भुलले.  त्याच्या याच खोट्या कृतीला भुलून राजकीय नेते आणि अधिकारी त्याच्या नादाला लागले. नकली सापासोबतच नकली वाघाचे कातडे वापरुन तो लोकांमध्ये भिती निर्माण करत असे ही बाब पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT