Ashok Kharat FIR Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Kharat Case: अशोक खरातचा पाय आणखी खोलात; सातवा गुन्हा दाखल, कोणी केली होती तक्रार

Seventh Case Filed against Ashok Kharat: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात यांच्याविरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात सातवा गुन्हा दाखल झाला आहे. प्रकरणाची संपूर्ण अपडेट वाचा.

Mangesh Mahale

Ashok Kharat Criminal Cases List: मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामध्ये राज्याच्या महिला आयोगाच्या प्रमुख रुपाली चाकणकरांना राजीनामा द्यावा लागला आहे. खरात प्रकरणामध्ये काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये निवेदन केलं. त्यामुळे या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

काल फडणवीसांनी सभागृहात खरात यांची संपूर्ण कुंडलीच वाचून दाखवली. आत्तापर्यंत खरात याच्यावर सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती फडणवीसांनी सभागृहाला दिली, या प्रकरणात आता सातवा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे लिंगपिसाट अशोक खरात याचा पाय आणखी खोलात असल्याचे चित्र आहे.

अशोक खरातविरोधात पोलिसात सातवा गुन्हा दाखल झाला आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ऑफिस बॉय नीरज जाधव विरोधात तक्रार करणा-या तरुणीनेच खरातविरोधात तक्रार दिली आहे. या तरुणीने दिलेल्या लैगिंक शोषणाच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खरातने कशाप्रकारे महिलांना धमकावून, फुस लावून, भक्तीच्या नावाखाली जाळ्यात ओढत लैंगिक अत्याचार, बलात्कार केले याबाबतची सविस्तर माहिती फडणवीसांनी दिली. त्याच्या संपत्तीबाबत आणि आतापर्यंत झालेल्या कारवाईसंदर्भातही त्यांनी सांगितली.

काही वरिष्ठ अधिकारी जर यात सहभागी असतील तर माहिती घेऊन चौकशी केली जात आहे. त्यांच्या संस्थानची आणि संस्थेवरील संचालकांची चौकशी केली जात आहे. खरातच्या सोबतच्या सर्वांचे जवाब नोंदवले जात आहेत. व्हिडीओ देणाऱ्या सर्वांचे जवाब नोंदवण्यात आले आहे. एसआयटी तपासातून पीडित महिलांची चौकशी केली आहे. 4 पीडित महिलांचे जवाब नोंदवून गुन्हे नोंद करण्यात आले असून खरातवर आतापर्यंत ६ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

अशोक खरातला ज्यांनी मदत केली असेल त्यांची चौकशी केली जाईल असेही फडणवीस यांनी एका सांगितले होते. त्यानुसार खरात याला ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मदत केली त्यांची चौकशी सुरु झाली आहे. पहिली प्रशासकीय कारवाई राज्य सरकारने केली आहे.

शासनाने अभिजित भांडे यांची प्रतिनियुक्ती काढून घेतली आहे. अशोक खरातसोबत पत्नीने केलेली गुंतवणूक त्याला भोवली आहे.अशोक खरातच्या मुलीबरोबर उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील यांच्या पत्नीची जमिनीची भागीदारी आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावर कंपन्या, रिअल इस्टेट फर्म्स, स्टार्टअप आणि उघड भागीदारी असल्याचे तपासात आढळले आहे. आता अभिजित भांडे यांना महसूल व वन विभागात रुजू होण्यास सांगण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT