

Ashok Kharat case political controversy: नाशिक येथील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याला महिलांचा बलात्कार व शोषण केल्याच्या आरोपात अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्यावर त्यांच्याशी संबंध असल्याचे आरोप झाले. या प्रकरणामुळे त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकर यांनी तंत्र-मंत्र विद्येसाठी आपली अनामिका जखमी केली असल्याचा गंभीर दावा केला. त्यांनी चाकणकर यांच्या बोटाला पट्टी बांधलेल्या फोटोही दाखवले आणि हे अंधश्रद्धा विधीचा भाग असल्याचे सांगितले.
मात्र आता या आरोपांना प्रत्यक्षदर्शींचा विरोध समोर आला आहे. रूपाली चाकणकर यांच्या निवासस्थानाजवळील धायरी परिसरातील स्थानिक रहिवासी यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून संपूर्ण प्रकरण स्पष्ट करत चाकणकर यांना झालेली जखम दरवाजामध्ये बोट अडकून झाल्यास बद्दल सांगितलं आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी जखमेबाबत स्पष्टीकरण दिला आहे. मात्र या दोन्ही नेत्यांच्या स्पष्टीकरणावरून सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, रुपाली चाकणकर यांच्या बोटाला झालेली दुखापत हो अनामिका नाही तर अपघात असल्याचा दावा चाकणकर समर्थकांनी केला आहे. पुण्यातील धायरी भागातील एका गणेश मंडळाने हा दावा केला असून,रुपाली चाकणकर या मंडळात आरती करण्यासाठी येत असताना गाडीतून उतरत असताना त्यांच बोट अडकले आणि त्यांना दुखापत झाली त्यावेळी टिश्यू पेपर लावून रुपाली चाकणकर या सहभागी झाल्या होत्या असा दावा करण्यात आला आहे. या समर्थकांचा व्हिडिओ रूपाली चाकणकर यांनी instagram वर देखील पोस्ट केला आहे.
या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील आपल्या अनामिकेला झालेल्या जखमेबाबत आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिल आहे. सुनील तटकरे यांनी देखील या स्पष्टीकरणात म्हणले की माझं देखील बोट गाडीच्या दरवाजात अडकून जखम झाली होती. यावर काही योगायोग आहे म्हणत काय योगा योग आहे म्हणत खोचक टीका अंधारे यांनी केली आहे.
रूपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांचे फोटो अनामिका कापलेले व्हायरल होत असताना आता दोघांनी दिलेलं कारण एकच असल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे तर..दोघांची कारणे एकच असल्याने टिका देखील होऊ लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.