Uddhav Thackeray. Ashok Kharat  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Kharat : भोंदू खरातवर उद्धव ठाकरे सरकारचीही मेहेरबानी, शिवनिका संस्थानला 39 लाख लीटर पाणी कुणाच्या आदेशावर पुरवलं?

Uddhav Thackeray Government help Ashok Kharat : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाचे महाविकास आघाडीचे सरकारदेखील भोंदू अशोक खरातवर मेहरबान झाल्याची बाब उघड झाली आहे.

Ganesh Sonawane

Maharashtra Politics : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना चांगलेच भोवले. भोंदूबाबा अशोक खरातमुळे चाकणकर यांची विकेट पडली असून त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

रुपाली चाकणकर यांचे खरात सोबतचे फोटो आणि त्याची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ समोर आल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर त्यांनी अखेर आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे दिला. दरम्यान आता महाविकास आघाडी सरकार सुद्धा या भोंदू खरातवर मेहरबान झाल्याचे समोर आले आहे.

सध्याच्या महायुती सरकारमधील अनेक बड्या नेत्यांचे खरात सोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे भोंदू अशोक खरात याला राजकीय वरदहस्त मिळाल्याचा संशय व्यक्त होत आहे. असे असतानाच याआधीच्या महाविकास आघाडीच्या सरकारनेही या भोंदू खरातला मदत केल्याचे उघड झाले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळातही खरातचा मोठा दबदबा असल्याची बाब आता समोर आली आहे. ज्या काळात सामान्य जनता पाण्यासाठी वणवण फिरत होती, त्याच सन २०१९-२०२० च्या करोना काळात महाविकास आघाडीच्या सरकारने अशोक खरातच्या मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थानसाठी दारणा धरणातून ३९ लाख लीटर पाणी देण्याचा निर्णय घेतला होता.

त्यामुळे अशोक खरातच्या संस्थानावर ही पाणीकृपा नेमक्या कोणाच्या आदेशावरुन झाली होती असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात उपस्थितीत केला जाऊ लागला आहे. त्यावेळी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. तर राष्ट्रवादी (शप) चे जयंत पाटील हे जलसंपदामंत्री होते. जयंत पाटील हे जलसंपदा मंत्री होते, त्यामुळे आता एका राष्ट्रवादीनंतर दुसऱ्या राष्ट्रवादीकडेही खरातला मदत केल्याचं बोट दाखवलं जात आहे.

भोंदूबाबा खरात अध्यक्ष असलेल्या मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थानसाठी दारणा धरण, गोदावरी उजवा तट कालवातून पाणी आरक्षित करण्यात आले होते. 39 लाख लिटर पाणी आरक्षित करण्याची मंजुरी सरकारने दिली होती. 31 जुलै 2020 रोजी यासाठीचा शासन निर्णय काढण्यात आला होता. हा शासन आदेश शासनाचे तत्कालिन सहसचिव अतुल अशोक कपोले यांच्या सहीने जारी करण्यात आला होता. त्यामुळे सिन्नरच्या दुष्काळी पट्ट्यात शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी खरातच्या संस्थानाला कोणत्या मंत्र्याच्या आदेशाने वळवलं गेलं हा प्रश्न उपस्थितीत केला जातो आहे.

पाणी कुठपर्यंत मुरलंय ते कळूद्या...

दरम्यान यासंदर्भात उद्धव ठाकरेंना माध्यमप्रतिनिंधीनी सवाल केला असता त्यावर प्रतिक्रिया देताना, तुम्ही सर्वांची चौकशी करा, पाणी कुठपर्यंत मुरलं आहे ते कळू द्या. जो गुन्हेगार असेल त्याला शिक्षा करा आणि जर पाणी वळवलं असेल तर ते पाणी कुठपर्यंत मुरलं आहे ते कळू द्या. फक्त ते कळल्यावर त्याच्यावर काही कारवाई झाली पाहिजे," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT