Ramdas Athawale: "आपण कोणत्याही भोंदू बाबाकडे न जाताच..."; रामदास आठवलेंचा नेमका कोणावर निशाणा?

Ramdas Athawale: स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु कॅप्टन अशोक खरात याला शेकडो महिलांच्या लैंगिक छळ आणि अत्याचार प्रकरणी अटक झाली आहे. या भोंदूबाबकडं राज्यातील अनेक राजकीय नेते हजेरी लावत असल्याचं समोर आलं आहे.
Ramdas Athawale
Ramdas Athawale
Published on
Updated on

Ramdas Athawale: स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु कॅप्टन अशोक खरात याला शेकडो महिलांच्या लैंगिक छळ आणि अत्याचार प्रकरणी अटक झाली आहे. या भोंदूबाबकडं राज्यातील अनेक राजकीय नेते हजेरी लावत असल्याचं समोर आलं आहे. या भोंदूबाबासोबतचे फोटो आणि पाद्यपुजनाचे व्हिडिओ तसंच ज्या धार्मिक संस्थेचा हा भोंदू बाबा अध्यक्ष होता त्याच संस्थेच्या विश्वस्त म्हणून काम केल्यामुळं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केलं आहे. आपण कोणत्याही भोंदूबाबाकडं जात नाही असं सांगताना त्यांनी काही राजकीय नेत्यांवर निशाणाही साधला आहे.

Ramdas Athawale
Ashok Kharat Case: '...म्हणून अशोक खरातचा 'या' तारखेला एन्काऊंटर होऊ शकतो!' महिला नेत्याच्या दाव्यानं राज्यात खळबळ

आठवलेंनी नेमकं काय म्हटलं?

आठवले म्हणाले, सामाजिक न्यायमंत्री आणि कार्यकर्ता म्हणून माझं म्हणणं हेच आहे की हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. यातील प्रमुख आरोपी भोंदूबाबा खरात याला अत्यंत कडक शिक्षा होणं गरजेचं आहे. लोकांनी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नयेत, कारण या भोंदूबाबानं अनेक महिलांवर अत्याचार केले आहेत. त्यामुळं या अशोक खरातवर कठोर शिक्षा झाली पाहिजे असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. त्याचबरोबर या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिलेला आहे त्यामुळं माझी मागणी आहे की, महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर लवकरात लवकरच दुसऱ्या महिलेची नियुक्ती करावी.

Ramdas Athawale
PMC News: पाणी बंद? जलसंपदा-पालिकेच्या वादात फडणवीसांची एन्ट्री; पुणेकरांना दिलासा मिळणार की धक्का?

बाबाकडं न जाताही मला सत्ता मिळते

चाकणकरांनी हे स्पष्ट केलं आहे की, खरात हे त्यांच्या कुटुंबाचे गुरु होते, पण त्यांनी हे आधी पाहायला हवं होतं की त्यांचं नेमकं काय सुरु होतं? चाकणकरांनी खऱंतर खऱातसारख्या भोंदूबाबाकडं जायला नको होतं. पण सध्या चाकणकरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्याचबरोबर इतर कोणते मंत्री खरातकडं गेले होते हे काही मला माहिती नाही. पण मी कुठल्याही बाबाकडं न जाता मला सत्ता मिळते. अशा भोंदूबाबाकडं जाऊन सत्ता मिळले यावर माझा विश्वास नाही, अशा शब्दांत त्यांनी जे कोणी राजकीय नेते आणि मंत्री अशोक खरातच्या आशीर्वादासाठी जात होते त्या सर्वांना आठवलेंनी टोला लगावला आहे. पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, काही लोकांचा अशा बाबांवर विश्वास आहे ठीक आहे. आपल्या समाजात लोकांची श्रद्धा असते पण अंधश्रद्धा असता कामा नये.

Ramdas Athawale
Ashok Kharat Fake Baba : अशोक खरातचे 'मोक्कार' कारनामे! नाशिक क्राइम ब्रांच झोपली होती का? परदेशी पळून जाण्याचा कट मुख्यमंत्र्यांनी उधळला; मंत्री विखेंचा दावा

मी कोणत्याही बाबाकडं जात नाही

आमच्या सांगलीमध्ये एक पाणीवाला बाबा होता, एखाद्या रुग्णाच्या अंगाला जर त्यानं चार-पाच वेळा पाणी लावलं तर तो बरा व्हायला असा लोकांचा समज होता. त्यामुळं मला वाटतं की बाबा असावेत पण ते असे भोंदू असू नयेत. दिल्लीत अनेक बाबा मंडळी आम्हाला तुमचं भाषण आवडतं असं सांगायला आणि भेटीसाठी येतात. पण तरीही मी या कोणत्याही बाबांकडे जात नाही, असंही आठवले यांनी अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com