Shobha Bacchav, subhash Bhamre, Asif Shaikh, Molana Mufti  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Asif Shaikh Politcal News : जगातील सर्वात मोठ्या भाजपचे 'या' मतदारसंघात नेहमीच होते डिपॉझिट जप्त

Dr. Shobha Bacchav Politics : भाजपला या मतदारसंघात उमेदवार शोधावा लागतो यावर अनेकांचा विश्वासच बसत नाही. असा एक मतदार संघ आहे जिथे भाजपला उमेदवारही मिळत नाही, हे धक्कादायक वास्तव आहे. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होऊ शकते.

Sampat Devgire

Malegaon City News : महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र असा एक मतदार संघ आहे जिथे भाजपला उमेदवारही मिळत नाही, हे धक्कादायक वास्तव आहे. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होऊ शकते.

नुकत्याच झालेल्या धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या (Congress) डॉ. शोभा बच्छाव यांना पाच लाख 83 हजार 866 तर भाजपच्या डॉ. सुभाष भामरे यांना पाच लाख 80 हजार 35 मते मिळाली शोभा बच्छाव 3 हजार 831 मतांनी विजयी झाल्या. यामध्ये मालेगाव मध्य मतदारसंघात काँग्रेसला सुमारे दोन लाख तर भाजपला अवघी 4 हजार 500 मते मिळाली आहेत.

धुळे मतदारसंघातील सर्व पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप (Bjp) आघाडीवर होते. त्यात डॉ. भामरे यांना जेव्हढी आघाडी मिळाली त्याहून अधिक मते काँग्रेसला एकट्या मालेगाव मध्य मतदार संघात मिळाली. हा चमत्कार पहिल्यांदा झालेला नाही. गेल्या निवडणुकीत 5 हजार तर यंदा साडे चार हजार अशी भाजपची स्थिती राहिली.

लोकसभेला येथे सर्व पक्ष इंडिया आघाडी म्हणून काँग्रेसच्या उमेदवारासाठी एकत्र लढले. त्यांनी भाजपचा अपमानजनक पराभव केला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मात्र हे सर्व वेगवेगळ्या पक्षांसाठी मत मागणार आहेत. त्यात जोरदार स्पर्धाही होईल. दोघांपैकी एक जण विजयी होईल. भाजपचा तेव्हाही धुव्वा उडालेला असेल.

(Edited By : Sachin Waghmare)

सध्या येथे एमआयएमचे (MIM) मौलाना मुफ्ती (Mollana Mufti) आमदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे आसिफ शेख यांचा 38 हजार 183 मतांनी पराभव केला होता. त्यावेळी भाजपच्या दिपाली विवेक वारुळे यांना 1,437 अशी नगण्य मते होती.

आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी आता सुरू झाली आहे. माजी आमदार असिफ शेख सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) शरदचंद्र पवार पक्षात आहेत. या स्थितीत एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट अशी मैत्रीपूर्ण लढत येथे होऊ शकते.

यामध्ये कोणत्याही स्थितीत भाजपला उमेदवार मिळवणे हे एकमेव ध्येय असेल. डिपॉझिट वाचवले तरी खूप झाले, अशी मालेगाव मध्य मतदारसंघात भाजपची स्थिती आहे. भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे, असा दावा केला जातो. या पक्षाला एखाद्या मतदार संघात उमेदवारासाठी शोधाशोध करावी लागते, यावर हा पक्ष विचार करेल का? असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे.

SCROLL FOR NEXT